Pooja Hegde has done romance in the film with Prabhas | प्रभाससोबत चित्रपटात रोमांस करणार पूजा हेगडे

पूजा हेगडे तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध चेहरा आहे. तिने बॉलिवूडमध्ये मोहनजो दारोसारख्या चित्रपटातून डेब्यू केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार ती आगामी चित्रपट सुपरस्टार प्रभास सोबत दिसण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार पूजा या ऑफरमुळे खूपच खूश आहे आणि ती हा चित्रपट साईन करणार आहे. ऐवढेच नाही तर तिला टॉलिवूड इंडस्ट्रीमधील दोन स्टारसोबत चित्रपट साईन केला आहे. यात ज्युनिअर एनटीआर आणि महेश बाबूसारखे कलाकार सुद्धा दिसणार आहेत. प्रभास आणि पूजा या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत त्याचे दिग्दर्शन राधा कृष्णा कुमार करणार आहे. हा चित्रपटाच्या प्रोडक्शनचे काम जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. 

प्रभास सध्या साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’मध्ये श्रद्धा कपूरचा डबलरोल साकारताना दिसणार आहे. साहोच्या माध्यमातून पहिल्यांदाच श्रद्धा आणि प्रभास एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही ती दिसणार आहे.  प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसह, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे.  

ALSO READ :  करण जोहरला नकार देणे प्रभासला पडले महाग! ‘साहो’ अडचणीत!!

गेल्या अनेक दिवसांपासून प्रभास आणि अनुष्काच्या लिंकअपची चर्चा आहे. अनुष्काला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रभास  ‘भागमती’ या चित्रपटाच्या सेटवरदेखील गेला होता. विशेष म्हणजे, कुणी ओळखू नये म्हणून प्रभास आपला चेहरा रूमालाने झाकून अनुष्काला भेटायला गेला. अर्थात इतके करूनही तो मीडियापासून लपू शकला नाही. या सेटवरचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला होता.  

Web Title: Pooja Hegde has done romance in the film with Prabhas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.