Piya Piafem Preeti-Pinky Singer Junky Munda! Read what is the reason !! | ​‘पिया पिया’फेम प्रिती-पिंकी सिंगर जोडीने केले मुंडण! वाचा काय आहे कारण!!

‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटातील राणी मुखर्जी व प्रिती झिंटा या दोघींचे ‘पिया पिया’ हे गाजलेले गाणे आठवते? हे गीत गायले होते, प्रिति व पिंकी नामक गायिकांनी. प्रिती-पिंकी या नावाने या दोघींची जोडी फेमस आहे. ‘इंडिया क्वीन्स’ नावानेही त्यांना ओळखले जाते. तर सध्या ही जोडी एका विधायक कारणाने चर्चेत आली आहे. होय, प्रिती व पिंकी या दोघींनी कॅन्सर पीडितांसाठी एक आगळे-वेगळे पाऊल उचलत, सगळ्यांना अवाक केले आहे.कॅन्सरने पीडित महिलांच्या समर्थनार्थ प्रिती व पिंकी या दोघांनी स्वत:चे मुंडण केले. याच नव्या लूकसह दोघींनी ‘हंगामा क्यों ना करें’ हे गाणे तयार केले आहे. या गाण्यात दोघीही प्रचंड कॉन्फिडन्ट दिसत आहेत.प्रिती व पिंकीचे हे गाणे कॅन्सर पीडितांना समर्पित आहे. कॅन्सर पीडितांना या रोगाशी लढण्यासाठी हे गाणे प्रेरित करेल. दोघींनीही कॅन्सरशी चार हात करणाºया महिलांना हे गाणे डेडिकेट केले आहे. केवळ कॅन्सर पीडितच नाही तर कॅन्सर नाही अशाही महिलांना प्रेरित करणारे हे गाणे आहे. प्रिती व पिंकी दोघीही गुजरातीआहेत. वयाच्या ५ व ७ वर्षांच्या वयापासून गायला सुरुवात केली. हिंदीशिवाय इंग्लिश, मल्याळम, गुजराती, सिंधी, मराठी, भोजपूरी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गायले आहे. या जोडीचे ‘पिया पिया’ हे गाणे चांगलेच गाजले होते. यानंतर ‘मैंने कोई जादू’(मुझे कुछ कहना है), ‘ता थाइया ता थइया’(आमदनी अठन्नी खर्चा रूपइया), ‘बेवफा बार में’(अनर्थ),‘होगा होगा’(अब के बरस) अशी अनेक गाणी या दोघींनी गायली आहेत.
Web Title: Piya Piafem Preeti-Pinky Singer Junky Munda! Read what is the reason !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.