'This' photo was trolled by Malaika Arora; The users said, 'What is the reason for divorce?' | ‘या’ फोटोमुळे ट्रोल झाली मलाइका अरोरा; युजर्सनी म्हटले, ‘यासाठीच घटस्फोट घेतला की काय?’

अभिनेत्री मलाइका अरोरा पुन्हा एकदा तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मलाइकाच्या ट्रोलिंगचे कारण तिचा एक फोटो आहे. मलाइकाच्या या फोटोचे काही युजर्सनी तोंडभरून कौतुक केले तर काहींनी तिच्यावर टीकास्त्रही सोडले. अनेकांनी तर अतिशय विचित्र अशा कॉमेण्ट देत मलाइकावर निशाणा साधला. वास्तविक मलाइकाला पहिल्यांदाच अशा अनुभवाचा सामना करावा लागत आहे, असे अजिबात नाही. कारण याअगोदरही बºयाचदा तिला कपड्यांवरून अशाप्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. मात्र यावेळेस ट्रोल करणाºयांनी अक्षरश: मर्यादा ओलांडल्या. त्याचे झाले असे की, मलाइकाने तिच्या आॅफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये मलाइकाने गोल्डन कलरचा गाऊन परिधान केलेला आहे. हा गाऊन प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिझाइन केला आहे. हा फोटो मलाइकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताचा युजर्सनी त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

या फोटोला काही युजर्सनी तिचे कौतुक करताना लिहिले की, ‘मलाइका तू खूपच सुंदर दिसत आहेस’. तर काहींनी लिहिले की, सेक्सी शब्दाची परिभाषा तुझ्यापासूनच सुरू होते. मात्र काही युजर्सनी अतिशय अश्लाघ्य अशा कॉमेण्ट दिल्या. एका युजर्सने लिहिले की, ‘या वयात तुला स्वत:ला असे कमी कपड्यात दाखविण्यासाठीच तू घटस्फोट दिला असेल.’ काही युजर्सनी तर अशा काही कॉमेण्ट दिल्या, ज्या आम्हाला शब्दात मांडणे अवघड होत आहे. 
 

दरम्यान, या अगोदर मलाइका तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ख्रिसमसनिमित्त तिने एक पार्टी दिली होती. पार्टीतील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु त्यावरून तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. युजर्सनी तिच्या शॉर्ट ड्रेसवर अतिशय उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या. मलाइकाने बॉलिवूड अभिनेता तथा निर्माता अरबाज खान याच्याशी लग्न  केले होते. गेल्यावर्षीच हे दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतरही मलाइकाचे खान परिवाराशी चांगले संबंध आहेत. 
Web Title: 'This' photo was trolled by Malaika Arora; The users said, 'What is the reason for divorce?'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.