Phamous movie review : सगळेच रटाळ!! | Phamous movie review : सगळेच रटाळ!!
Phamous movie review : सगळेच रटाळ!!
Release Date: June 01,2018Language: हिंदी
Cast: जॅकी श्रॉफ, जिमि शेरगिल, केके मेनन, श्रिया सरन, माही गिल, पंकज त्रिपाठी
Producer: राज खत्री, अमिताभ चंद्रा ,सुमीत जावडेकरDirector: करण बुटानी
Duration: १ तास ५५ मिनिटGenre:

लोकमत रेटिंग्स

 -जान्हवी सामंत 

‘बंदूकबाजी’ असलेल्या चित्रपटांबद्दल एक विशेष समस्या असते. ती म्हणजे, थोडीशी ‘ढिशूम ढिशूम’ झाली की, ते चित्रपट कंटाळवाणे वाटू लागतात.  त्याहून मोठी समस्या म्हणजे, या ढिशूम ढिशूममधील कर्णकर्कश संवाद ऐकून कानही दुखू लागतात. चंबळच्या खो-यातील ‘फेमस’ ही अशीच कर्णकर्कश कथा आहे. चंबळच्या दोन तीन गुंडाभोवती ही कथा फिरते. एका लग्नादरम्यान ‘दबंग’ शंभू (जॅकी श्रॉफ) याच्या हाताने गोळी लागून एका नववधूचा मृत्यू होतो.  तो तुरूंगात  जातो आणि त्याच्यानंतर त्याच्याच टोळीचा कडकसिंग (केके) ‘बाहुबली’ बनतो.

कुणाला कुठेही आणि कसेही गोळ्या झाडून लोळवण्यास तो घाबरत नाही. स्त्रीलपंट राजकारणी राम विजय त्रिपाठी (पंकज त्रिपाठी)याच्यासाठी कडकसिंग कुठल्याही स्तराला जावू शकतो. अगदी त्याला मुली पुरवण्याचे कामही तो करतो. कडकसिंगमुळेच गावात राम विजय त्रिपाठीचा दरारा असतो. राम विजय त्रिपाठी आणि कडक सिंग यांच्या या समीकरणात राधेश्याम (जिमी शेरगिल) या मुलाचा प्रवेश होतो. एकदा कडकसिंगने एक खुन केलेला बघितला असतानाही  राधे त्याच्याविरोधात साक्ष्य देत नाही. त्यामुळे कडकसिंग नेहमीच स्वत:ला राधेचा ऋणी मानत असतो. राधेसोबत त्याचे एक खास नाते निर्माण होते. हाच राधे पुढे लल्लीशी (श्रिया सरन) लग्न करून तिला आपल्या घरी आणतो. याचदरम्यान नुकतीच बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या  त्रिपाठीची नजर तिच्यावर पडते आणि तो तिला आपली करण्याचा निश्चय करतो. त्याच्या राजकीय दबावामुळे कडकसिंग त्याला थांबवूही शकत नसतो. शिवाय राधेशी असलेल्या नात्यामुळे त्रिपाठीला मदतही करू शकत नसतो. कडकसिंगवर मनापासून प्रेम करणारा राधे आपल्या पत्नीला वाचवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर तुम्हाला ‘फेमस’ चित्रपटगृहात जावूनचं बघावा लागेल.

चित्रपट बघताना पहिल्या २० मिनिटांतच चित्रपट किती कंटाळवाणा आहे, याचा अंदाज येतो. काही दृश्यानंतर तोच तोचपणा जाणवायला लागतो. सुरूवातीला केकेची ‘शोबाजी’ दाखवण्यातचं वेळ फुकट जातो. इतका की, कथा पुढे सरकतचं नाही, असे वाटायला लागते. प्रत्येक पाच मिनिटाला गोळीबार सोडला तर चित्रपटात काहीच होत नाही. चित्रपटाची स्टारकास्ट इतकी तगडी असूनही चित्रपटात दम जाणवत नाही. केके, जिमी शेरगिल आणि पंकज त्रिपाठी इतके तगडे अभिनेतेही अगदी नाखूश होऊन काम करताहेत, असेच अख्खा चित्रपट पाहताना जाणवते.

त्यातच सारख्या सारख्या शिव्या वैताग वाढवतात. चित्रपटाचा पहिला भाग त्यामुळे अतिशय रटाळ आहे. त्यामुळे दुसºया भागात चित्रपटाची कथा पुढे सरकेपर्यंत प्रेक्षकांचा संयम संपलेला असतो. इतकी ढिशूम ढिशूम, गुंडागर्दी आणि शिव्या ऐकायच्या असतील तर गँग आॅफ वासेपूर किंवा बुलेट राजा अशा याच विषयावर बनलेले चित्रपट डीव्हीडीवर बघता येतील. त्यासाठी चित्रपटगृहात जावून ‘फेमस’ बघायची अजिबात गरज नाही. 

Web Title: Phamous movie review : सगळेच रटाळ!!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.