This person is responsible for making Sunny Leone a porn star; Saturn has revealed himself! | सनी लिओनीला पोर्न स्टार बनविण्यामागे ही व्यक्ती आहे जबाबदार; स्वत: सनीनेच केला खुलासा!

नुकतीच अभिनेत्री सनी लिओनीच्या आगामी ‘वीरमादेवी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्याची तुलना सोशल मीडियावर ‘बाहुबली’ या चित्रपटाशी केली जात आहे. चाहत्यांना पोस्टरमधील सनीचा अंदाज खूपच आवडत आहे. पोस्टरमध्ये सनी घोड्यावर बसून, एका यौद्धाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातून सनी मल्याळम चित्रपटांमध्ये डेब्यू करीत आहे. सनीकडे बॉलिवूडचे बरेचसे प्रोजेक्ट आहेत. एवढे काम मिळत असतानाही सनी काहीशी त्रस्त असल्याचे बघावयास मिळत आहे. याबाबतचा खुलासा तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून केला आहे. 

सनीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती काहीशी त्रस्त दिसत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू दिसत असून, ती खूपच परेशान असावी असे दिसत आहे. सनीने या फोटोवर एक इमोशनल पोस्टही लिहिली. सनी आपला भुतकाळ आठवून दु:खी होताना दिसत आहे. सनीने पोस्टमध्ये लिहिले की, ‘आजच्या रात्री माझे मन हजार वेळा तुटले. कदाचित आजच्या रात्री डोळ्यातून आलेले हजारो अश्रू, पुन्हा एकदा आठवत आहेत आणि दु:ख व्यक्त करीत आहेत. पुन्हा एकदा मी स्वत:ला जवळ करू इच्छिते. ते दिवस परत येणार नाहीत, मात्र कायमचे स्मरणात राहणार आहेत. मी जो मार्ग निवडला त्यास #करणजीतकौर जबाबदार आहे. सनीने पोर्न स्टार बनण्यास स्वत:लाच जबाबदार धरले आहे. 
 

बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर सनी एक पोर्न स्टार म्हणून काम करीत होती. जेव्हा सनीच्या आईला तिच्या या कामाविषयी कळाले होते तेव्हा ती खूपच दु:खी झाली होती. सनी आपल्या आईच्या मृत्यूस स्वत:ला जबाबदार समजते. सनीने तिच्या डॉक्युमेंट्रीमध्ये आईचा उल्लेख केला आहे. तिने म्हटले की, ‘मी आईला माझ्या डोळ्यासमोर मरताना बघितले. मी तिला मॉर्फिनचा अखेरचा डोज दिला होता आणि ती झोपायला गेली होती. कधी-कधी मी असा विचार करते की, माझ्या त्या अखेरच्या डोजमुळेच तिचा मृत्यू झाला असावा. मला असे नाही वाटत की, मी तिला मारले. परंतु मी तिला औषध दिल्याच्या काही वेळातच तिचा मृत्यू झाला. 
Web Title: This person is responsible for making Sunny Leone a porn star; Saturn has revealed himself!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.