This person is lucky charm for Ranveer Singh | रणवीर सिंगसाठी 'ही' व्यक्ती ठरली लकी चार्म
रणवीर सिंगसाठी 'ही' व्यक्ती ठरली लकी चार्म

ठळक मुद्देरणवीर सिंगसाठी दीपिका पादुकोण ठरली लकी चार्म

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा इटलीमध्ये मोठ्या दिमाखात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली होती. त्या दोघांच्या विवाहाची वार्ता ऐकून त्यांचे चाहते खूप खूश झाले होते. रणवीर सिंगसाठी हे लग्न खूपच लकी ठरले आहे. लग्नानंतर लगेच प्रदर्शित झालेला त्याचा 'सिम्बा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रणवीर सिंगचा हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.


प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एका स्त्रीचा हात असतो ही म्हण रणवीरसाठी खरी ठरताना दिसत आहे. दीपिकासोबत लग्न झाल्यानंतर प्रदर्शित झालेल्या पहिल्याच चित्रपटाने मोठे यश मिळविल्यामुळे रणवीरसाठी दीपिका ही लक्ष्मीच ठरली आहे. रणवीर सिंगने २०१८ची दमदार सुरूवात दीपिका पादुकोणसोबत पद्मावत सिनेमाने केली. तर वर्षाअखेर सिम्बा चित्रपटाने झाली. 
बॉलिवूडमधील ही सुपरहिट जोडी गलियों की रास लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत चित्रपटात एकत्रित झळकली आहे. या सर्व चित्रपटातील रणवीर-दीपिकाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यानंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी बनले आहेत.


 रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३'साठी दीपिका पादुकोणला देखील विचारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. निर्मात्यांनी या चित्रपटात दीपिका कपिल देवची पत्नी रोमीची भूमिका करण्यासाठी विचारले व निर्मात्यांच्या नुसार दीपिका हे काम एका आठवड्यात पूर्ण करू शकते. मात्र दीपिका पादुकोणच्या जवळच्या सूत्रांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या दीपिकाची बॉक्स ऑफिसवर असलेल्या ब्रॅण्ड व्हॅल्यूनुसार ती स्पेशल अपियरन्स करू शकणार नाही.

दीपिकाने आगामी सिनेमा 'छपाक'चे काम सुरू केले. दीपिकाने सिनेमातील निगडीत व्यक्तींसोबत बैठक केली व या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअपची करण्याची गरज आहे की नाही, यावर सल्ले घेतले. 'छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


Web Title: This person is lucky charm for Ranveer Singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.