गेल्या काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की, मस्कुलर बॉडीसाठी ओळखला जाणारा अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांच्यात वादाची ठिणगी पडली असून, लवकरच हे दाम्पत्य विभक्त होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही म्हटले जात होते. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, या निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे. होय, जॉन त्याच्या सुंदर पत्नीबरोबर नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला असून, दोघांकडे बघता त्यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत होते. दोघांच्या चेहºयावर स्मित हास्य होते. जॉन नेहमीच त्याची पर्सनल लाइफ त्याच्या प्रोफेशनल लाइफपासून वेगळी ठेवतो. त्यामुळेच तो फारच कमी वेळा पत्नीसोबत पब्लिकली बघावयास मिळाला आहे. दरम्यान, जेव्हा हे दोघे एकत्र स्पॉट झाले तेव्हा जॉनने ब्लू कलरची हुडी घातलेली होती. नेहमीप्रमाणे तो या लूकमध्ये खूपच हॅण्डसम दिसत होता. तर त्याच्या पत्नीने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर तिने डेनिम जॅकेटही घातले होते. 

जॉन आणि प्रिया २०१४ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. प्रियाचा जन्म अमेरिकेत झाला असून, ती एक इन्व्हेस्टमेंट बॅँकर आहे. प्रियासोबत लग्न करण्याअगोदर जॉनचे अभिनेत्री बिपाशा बसू हिच्याशी अफेयर होते. दोघे लग्न करतील असे बोलले जात होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेकअप झाले. दरम्यान, दोघांनीही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडला असून, ते वैवाहिक जीवन जगत आहेत. जॉनने प्रियाशी तर बिपाशाने अभिनेता करणसिंग ग्रोव्हर याच्याशी लग्न केले आहे. 
Web Title: Period of divorce for divorce; Captured with John Abraham, see the photo!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.