Peepli live actor Sitaram Panchal passes away | पीपली लाईव्ह अभिनेते सीताराम पांचाळ यांचे निधन

पान सिंग तोमर आणि पीपली लाईव्ह सारख्या चित्रपटात काम केलेले अभिनेते सीताराम पांचाळ यांचे अाज निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनी आणि   कॅन्सरशी झुंज देत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी या पोस्टमध्ये उपचारांसाठी मदत मागितली होती. मला मदत करा मी कॅन्सरशी लढा देतो आहे माझी आर्थिक स्थिती फारच वाईट आहे. तुमचा सीताराम पांचाळ असे लिहित त्यांनी लोकांपुढे मदत मागितली होती. त्यांना मदत करण्यासाठी लोकांनी मदतीचा हातदेखील पुढे केला होता. 2014मध्ये त्यांना कॅन्सरचे झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ही त्यांनी हिम्मत न हारता जॉली एलएलबीमध्ये काम केले होते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यानचे काही फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये त्यांना ओळखणे ही अवघड झाले होते. 1994 साली आलेल्या बैंडेट क्वीन या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कॅन्सरशी लढताना त्यांनी आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली होती. काही दिवसांपासून आर्थिक अडचणींमुळे अॅलोपथिक औषध बंद करुन त्यांनी आयुर्वेदिक औषध घेणे सुरु केले होते.  शेवटच्या दिवसांत त्यांचे वजन 30 किलोवर आले होते.  पत्नी आणि 19 वर्षांच्या मुलासोबत ते मुंबईतल्या मीरारोड भागात राहत होते. घरी ते ऐकटेच कमावणारे होते. संजय मिश्रा, रोहिताश गौडं. आणि राकेश पासवान  या त्याच्या तीन मित्रांनी शेवटपर्यंत साथ दिली.त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि  त्यांची प्राणज्योत आज मालवली.  
Web Title: Peepli live actor Sitaram Panchal passes away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.