Parineeti spoken and even cropped! | ​परिणीती बोलली अन् भलतीच फसली!

परिणीती चोप्रा सध्या ‘ड्रिम टूर’च्या निमित्ताने अमेरिकेत आहे. ‘ड्रिम टूर’मधील परफॉर्मन्ससाठी एकीकडे परिणीतीची प्रशंसा होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर तिला टीकेचा सामना करावा लागतो आहे.परिणीतीने  तिच्याच एका मैत्रिणीला नकळतपणे असे काही डिवचले की,सोशल मीडियावर परीला संतापाला सामोरे जावे लागले. परिणीतीच्या एका फॅन क्लबने एक व्हिडिओ शेअर केला. त्यात परिणीती आलिया भट्ट हिच्यासोबत एका कॉमन फ्रेन्डला बर्थ डे विश करताना दिसत आहे. बर्थ डे विश केल्यानंतर आलियाने परिणीतीला बर्थ डे गर्लला काही टीप्स असल्यास त्या देण्यास सांगितले. यावर परिणीतीने काय टीप्स द्यावी तर ‘कम खाओ और पतली हो जाओ’. आता परिणीतीने अगदी गमतीगमतीत ही टीप्स दिली. पण टिष्ट्वटरवर परिणीतीच्या या अशा वागण्यावर टीका सुरु झाली. अलीकडे परिणीती स्वत: बरीच स्लीम झाली आहे. मात्र ती स्वत: सुद्धा कधीकाळी ‘बॉडी शेमिंग’ची शिकार ठरली होती. विशेष म्हणजे अलीकडे एका मुलाखतीत परिणीतीने याबद्दल लोकांना फटकारले होते. माझ्या दिसण्यावर बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही, असे परी म्हणाली होती. मग परिणीतीला हा अधिकार कुणी दिला??

{{{{twitter_video_id####}}}}{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Parineeti spoken and even cropped!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.