परिणीती चोप्रा अन् अर्जुन कपूरला चाहत्यांनी दिला लग्नाचा सल्ला...मग दोघांनीही घेतली एकमेकांची फिरकी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 11:39 AM2018-09-04T11:39:34+5:302018-09-04T11:41:19+5:30

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी अलीकडे एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो काही क्षणात व्हायरल झाले. 

parineeti chopra troll arjun kapoor for marriage actor give awesome reply | परिणीती चोप्रा अन् अर्जुन कपूरला चाहत्यांनी दिला लग्नाचा सल्ला...मग दोघांनीही घेतली एकमेकांची फिरकी!!

परिणीती चोप्रा अन् अर्जुन कपूरला चाहत्यांनी दिला लग्नाचा सल्ला...मग दोघांनीही घेतली एकमेकांची फिरकी!!

googlenewsNext

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी अलीकडे एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो काही क्षणात व्हायरल झाले. केवळ व्हायरलचं नाही तर यानंतर चाहते परिणीती आणि अर्जुनला दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करण्याचा सल्ला देऊन मोकळे झालेत.

 तुम्ही एकमेकांसाठी एकदम परफेक्ट आहात. तुम्ही दोघे एकमेकांशी लग्न का करत नाही? अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. मग काय, ‘परिणीती-अर्जुनला चाहत्यांनी दिला लग्नाचा सल्ला,’ अशी हेडलाईनही बनली. ही हेडलाईन परिणीतीने वाचली आणि अर्जुनची फिरकी घेण्याचे तिचे मूड झाले. परिणीतीने या हेडलाईनचा फोटो शेअर करत, एक मजेशीर ट्विट केले.



 ‘ओह नाही. अर्जुन कपूर प्लीज दूर राहा, कारण माझ्याकडे डेट्स नाहीत. प्लीज माझ्या मॅनेजरशी बोल...’ असे तिने लिहिले़ आता परिणीती आपली फिरकी घेतेय, म्हटल्यावर अर्जुन थोडीच शांत बसणार. त्यानेही षट्कार ठोकला. 



‘छोकरा जवान है...पण लग्नाची कुठलीही घाई नाही. परिणीती, तू योग्य वयाची प्रतीक्षा कर आणि तोपर्यंत मी माझ्या पर्यांयावर विचार करतो,’असा रिप्लाय अर्जुनने दिला. आहे ना मजेशीर...
लवकरचं परिणीती आणि अर्जुन यांचा ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट येतोय. तूर्तास अर्जुन व परी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. परिणीती व अर्जुन दोघांनीही २०१२ मध्ये ‘इशकजादे’ या चित्रपटातून डेब्यू केला होता.

Web Title: parineeti chopra troll arjun kapoor for marriage actor give awesome reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.