फुलराणी सायना नेहवाल साकारण्यासाठी परिणिती चोप्रा घेतेय मेहनत, बॅडमिंटन कोर्टवर गाळतेय घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 10:42 AM2019-04-06T10:42:49+5:302019-04-06T10:45:51+5:30

बॅडमिंटन हा एक कठीण खेळ आहे. त्यासाठी कठोर परिश्रमही तितकेच गरजेचे आहेत.त्यामुळे सध्या बॅटमिंटनसह इतर गोष्टींवर परिणीती मेहनत घेत आहे.

Parineeti Chopra sweats it out on court for Saina Nehwal biopic. See pic | फुलराणी सायना नेहवाल साकारण्यासाठी परिणिती चोप्रा घेतेय मेहनत, बॅडमिंटन कोर्टवर गाळतेय घाम

फुलराणी सायना नेहवाल साकारण्यासाठी परिणिती चोप्रा घेतेय मेहनत, बॅडमिंटन कोर्टवर गाळतेय घाम

googlenewsNext

सायना नेहवालच्या बायोपिकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी निर्मात्यांनी या सिनेमातील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूकसुद्धा आऊट केला होता. मात्र सिनेमाचे शूटिंग सुरु होण्यापूर्वीच बायोपिकमधून श्रद्धा कपूर आऊट झाली . श्रद्धाने स्वत:हुने या सिनेमातून माघार घेतल्याचे कारण समोर आले होते. त्यानंतर श्रद्धाच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली. परिणीती फुलराणी सायना नेहवालच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत असल्याचे समोर येत आहे. खरंतर श्रद्धाला सायनाचे बॅडमिंटन स्किल आवडले नव्हते. त्यामुळे अनेक शूटिंगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सायना ही श्रद्धाच्या परफॉर्मन्सवर फारशी खुश नव्हती. त्यामुळे तिला हा सिनेमा सोडावा लागला. असाच प्रकार आता आपल्याबरोबर होवू नये म्हणून परिणीती चोप्रा  बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे. नुकताच परिणीतीचा बॅटमिंटनचे प्रशिक्षण घेत असल्याचे एक फोटो समोर आला आहे.  

तसेच दिलेल्या एका मुलाखतीत परिणीतीने सांगितले की, ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात. अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर ते त्या खेळात प्राविण्य मिळवतात किंवा यश संपादन करतात. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी मी माझ्या परिने पूर्णपणे प्रयत्न करेन.

बॅडमिंटन हा एक कठीण खेळ आहे. त्यासाठी कठोर परिश्रमही तितकेच गरजेचे आहेत.त्यामुळे सध्या बॅटमिंटनसह इतर गोष्टींवर 
परिणीती मेहनत घेत आहे. तसेच या वर्षी सिनेमाची शूटिंगही संपवून 2020 मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्माते भूषण कुमार 
यांनी ठरवले आहे.

Web Title: Parineeti Chopra sweats it out on court for Saina Nehwal biopic. See pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.