parineeti chopra gives clarification about shoe hidden ritual says nick jonas shocked me | परिणीती चोप्राला जीजू निक जोनासने दिले गिफ्ट, परी झाली शॉक केले 'हे' ट्वीट
परिणीती चोप्राला जीजू निक जोनासने दिले गिफ्ट, परी झाली शॉक केले 'हे' ट्वीट

ठळक मुद्देपरिणीतीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे यात तिने निकला उदार असल्याचे म्हटले आहे

देसीगर्ल प्रियांका चोप्रा आता मिसेस जोनास झाली आहे. प्रियांकाचे लग्नासंबंधीत प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. प्रियांकाच्या लग्नाच्या लोकेशनपासून ते परिणीतीने बूट लपवण्यासाठी मागितलेल्या रक्कमेपर्यंत सगळ्याच गोष्टी चर्चेत राहिल्या. प्रियांका आणि निकच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत.    मिळालेल्या माहितीनुसार निकचे बूट त्याची मेहुणी परिणीती चोप्राने लपवले होते. या विधीसाठी निकने परिणीतीला 5 लाख रुपये दिल्याची माहिती आहे. परिणीतीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. यात तिने निकला उदार असल्याचे म्हटले आहे. निकने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि  मी अजूनही आनंदात असल्याचे परिणीतीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पण निकने नेमके काय गिफ्ट दिले हा खुलासा परिणीतीने केला आहे.  

    
गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू विधीने लग्न केले.  


उमेद भवनात शाही वरात निघाली़ यानंतर हिंदू मंत्रोच्चारात दोघांचाही विवाह पडला. हा विवाह सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. लग्नाचे रिसेप्शनही अगदी असेच डोळ्यांची पारणे फेडणारे होते, हे सांगणे नकोच. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ड्रोनने कुणी फोटो घेऊ नये यासाठी खास इस्राईलवरून १२ शूटर्स बोलवण्यात आले होते. तथापि आज रिसेप्शनला काही तास असताना प्रियांका व निकच्या लग्नाचे अधिकृत फोटोही जारी करण्यात आले. 


Web Title: parineeti chopra gives clarification about shoe hidden ritual says nick jonas shocked me
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.