सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्रा करतेय 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 06:06 PM2019-04-09T18:06:11+5:302019-04-09T18:07:11+5:30

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूर बाहेर पडल्यानंतर परिणीती चोप्राची वर्णी लागली आहे.

Parineeti Chopra is doing 'This' thing for Saina Nehwal biopic | सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्रा करतेय 'ही' गोष्ट

सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्रा करतेय 'ही' गोष्ट

googlenewsNext

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूर बाहेर पडल्यानंतर परिणीती चोप्राची वर्णी लागली आहे. नुकताच सायनाच्या लूकमधील परिणीतीचा फर्स्ट लूक समोर आला आहे.


बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर चित्रपट येत असून या चित्रपटात तिच्या भूमिकेत अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार आहे. या भूमिकेसाठी परिणीती दररोज दोन तास सामन्यांचे व्हिडिओ आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहत आहे. परिणीती चोप्राने या बायोपिकमधील फर्स्ट लूक नुकताच शेअर केला आहे. या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

परिणीती नुकतीच अक्षय कुमार अभिनीत केसरी चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर ती संदीप और पिंकी फरार व जबरिया जोडी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


सध्या बॉलिवूडमध्ये खूप बायोपिक बनत आहेत. सायना नेहवालच्या बायोपिकसाठी आधी श्रद्धा कपूरला साइन केले होते. त्यानंतर श्रद्धाने या चित्रपटाच्या तयारीला देखील सुरूवात केली होती.

श्रद्धा बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सारखी बनण्यासाठी प्रशिक्षण घेत होती. श्रद्धा व सायनाने एक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात त्या दोघी प्रशिक्षण घेताना दिसत होते. श्रद्धा दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांच्या अॅकाडमीमधून बॅडमिंटन खेळण्याचे प्रशिक्षण घेते आहे.                              

Web Title: Parineeti Chopra is doing 'This' thing for Saina Nehwal biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.