Paresh Rawal's entry in 'Tiger is alive' | ​‘टायगर जिंदा है’मध्ये परेश रावल यांची एन्ट्री!

सलमान खान व कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरु होणार आहे. सलमान व कॅटरिनासोबतच या चित्रपटात आणखी एक दमदार अभिनेता सामील होणार आहे. होय, हा अभिनेता म्हणजे, परेश रावल. होय,  कॉमिक व निगेटीव्ह अशा दोन्ही भूमिका अगदी लीलया साकारणारे परेश रावल या चित्रपटात कुठल्या भूमिकेत दिसणार, याची उत्सूकता तुम्हाला असेलच. पण आमचे मानाल तर, परेश रावल यावेळी कॉमेडी वा निगेटीव्ह भूमिकेत नाही तर एका सरप्राईजिंग भूमिकेत दिसणार आहेत. होय, चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ही माहिती दिली. मी कायम परेश यांच्या कामाने प्रभावित होत आलो आहे. प्रत्येक भूमिका ते वेगळ्या पद्धतीने साकारतात. ‘टायगर जिंदा है’च्या निमित्ताने मी प्रथमच त्यांच्यासोबत काम करणार आहे, असे जफर म्हणाले. यापूर्वी सलमान व परेश ही जोडी ‘रेडी’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. आता पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहणे निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे.

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ हा २०१२ साली रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे.  यात सलमान खान भारतीय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे तर कॅटरिना कैफ ही पाकिस्तानी ऐजंटची भूमिका करणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान व कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा है’च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या चित्रपटाची कथा तेथून सुरू होणार आहे. जेथे ‘एक था टायगर’ची कथा संपली होती. या चित्रपटाची कथा आजच्या काळातीलच असेल. यात सलमान खान व कॅटरिना कैफ ‘एक था टायगर’मधील पात्रांमध्येच पहायला मिळतील. चित्रपटातील पात्रांच्या वयात कोणताच बदल झालेला दिसणार नाही. ‘टायगर जिंदा है’ मधील अ‍ॅक्शन दृष्ये हे डोळ्यांचे पारणे फे डणारी ठरणार आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार  आहे.
Web Title: Paresh Rawal's entry in 'Tiger is alive'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.