In the pardes of Subhash Ghai, Mahima Chaudhary and Apoorva Agnihotri were not to be seen in the main role. | ​सुभाष घई यांच्या परदेसमध्ये महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री नव्हे तर हे कलाकार झळकणार होते मुख्य भूमिकेत

सुभाष घईंनी दिग्दर्शित केलेला परदेस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील शाहरुख खान, महिमा चौधरी यांच्या सगळ्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. महिमाचा हा पहिला चित्रपट असला तरी तिने तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटात अपूर्व अग्निहोत्री देखील मुख्य भूमिकेत होता. पण तुम्हाला माहीत आहे का, परदेस या चित्रपटासाठी सुभाष घई यांची पहिली चॉईस महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री नव्हते. बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध कलाकारांनी या चित्रपटात काम करावे अशी त्यांची इच्छा होती. 
परदेस या चित्रपटात सलमान खान, शाहरुख खान, माधुरी दिक्षित मुख्य भूमिका साकारणार होते. खलनायक या सुभाष घई यांच्या चित्रपटात माधुरीने मुख्य भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सुभाष घई यांनी माधुरीला गंगा या व्यक्तिरेखेविषयी सांगितले होते. तिला देखील ही भूमिका आवडली होती. एनआरआय तरुणाच्या भूमिकेसाठी सलमान खान योग्य आहे असे त्यांना वाटत होते. चित्रपटाची कास्ट काय असणार हे सुभाष घई यांच्या डोक्यात पक्के होते. पण माधुरीपेक्षा एखाद्या नव्या चेहऱ्याला या चित्रपटात संधी द्यावी असे त्यांना नंतर वाटायला लागले होते. त्याचसोबत या चित्रपटात एनआरआय तरुणाची भूमिका साकारणारा तरुण हा अगदी पाश्चिमात्य देशातील तरुणासारखाच दिसावा, त्याचे हिंदी तितकेसे स्पष्ट नसावे असे त्यांचे मत होते. त्यामुळे सलमान पेक्षा एखादा नवीन अभिनेता या भूमिकेसाठी निवडण्याचे त्यांनी ठरवले. पण त्यांच्या या निर्णयाला या चित्रपटाच्या निर्मात्यांचा विरोध होता. सलमान, शाहरुख, माधुरी यांसारखी भली मोठी स्टार कास्ट चित्रपटात असली तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच यश मिळवेल अशी त्यांना खात्री होती. पण काही केल्या सुभाष घेई त्यांच्या मतावर ठाम होते आणि त्यामुळे त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना या गोष्टीसाठी तयार केले आणि या चित्रपटात महिमा चौधरी आणि अपूर्वा अग्निहोत्री असे दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

Also Read : या कारणामुळे परदेस फेम महिमा चौधरी आहे बॉलिवूडपासून दूर
Web Title: In the pardes of Subhash Ghai, Mahima Chaudhary and Apoorva Agnihotri were not to be seen in the main role.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.