Pappa Shah Rukh Khan's true-copy is Aryan Khan! | पप्पा शाहरूख खानची ट्रू-कॉपी आहे आर्यन खान !

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान नेहमीच त्याच्या लहान आणि मोठ्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करीत असतो. हे फोटो बघून तुमच्या लक्षात येईल की, शाहरूखचा लहान मुलगा अबरामच नव्हे तर मोठा मुलगा आर्यनही शाहरूखची हुबेहूब कॉपी आहे. कदाचित याअगोदर कोणी ही बाब नोटीस केली नसावी; मात्र आम्ही पुराव्यानिशी तुम्हाला याविषयी सांगत आहोत. काही दिवसांपूर्वी असे म्हटले जात होते की, आर्यन मम्मी गौरी खानसारखा दिसतो, परंतु आर्यन मम्मीसारखा दिसत नसून, पप्पा शाहरूख खानची हुबेहूब कॉपी आहे. बातमीमध्ये दाखविण्यात आलेल्या फोटोचे जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की, आर्यनचे नाक, त्याचे दाट केस, ओठ आणि डोळे पप्पा शाहरूखसारखे आहेत. तो सध्या विदेशात त्याचे शिक्षण पूर्ण करीत आहे; मात्र जेव्हा-जेव्हा तो मुंबईत येतो, तेव्हा त्याच्या जवळच्या मित्रांसोबत पार्टीमध्ये हमखास बघावयास मिळतो. आर्यन महागड्या आणि रेसिंग कारचा प्रचंड चाहता आहे. त्याच्याजवळ खूप लक्झरी कार आहेत. एकापेक्षा एक कार असलेल्या आर्यनचे कार कलेक्शन बघण्यासारखे आहे. त्याच्याकडे इटॅलियन कारमेकर फरारीची मिड-इंजन्ड स्पोटर््स कार आहे. त्याचबरोबर बीएमडब्ल्यूची आय-८ ही कारदेखील त्याच्या कलेक्शनमध्ये आहे. या कारची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. आर्यनला कारबरोबरच पार्ट्यांमध्ये मित्रांसोबत एन्जॉय करायलाही खूप आवडते. काही काळापूर्वी तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिच्यासोबत पार्टीत बघावयास मिळाला होता. आर्यन आणि नव्या नवेली खूपच चांगले मित्र आहेत. लंडनमधील एका शाळेत नव्या आणि आर्यन एकत्र शिकत होते. शिक्षण घेतानाच त्याच्यात मैत्री निर्माण झाली. नुकतेच दोघांनीही त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नव्या आणि आर्यन तेव्हा एकदा चर्चेत आले होते जेव्हा या दोघांचा एक एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या एमएमएसमध्ये एक मुलगा आणि मुलगी दिसत आहे. असे म्हटले जात आहे की, तो मुलगा आणि मुलगी दुसरे-तिसरे कोणीही नसून, आर्यन आणि नव्या आहे. 
Web Title: Pappa Shah Rukh Khan's true-copy is Aryan Khan!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.