‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठींनाही राजकारणाचे वेध...बस और थोडा इंतजार...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:27 PM2019-04-02T12:27:03+5:302019-04-02T12:27:48+5:30

गत महिन्यांत पंकज त्रिपाठी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘लुका-छुपी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे आणि अशाच पंकज त्रिपाठी यांनाही राजकारणाचे वेध लागले आहे.

pankaj tripathi wants to join politics but fans have to wait | ‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठींनाही राजकारणाचे वेध...बस और थोडा इंतजार...!!

‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठींनाही राजकारणाचे वेध...बस और थोडा इंतजार...!!

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षी आलेली ‘मिर्झापूर’ ही त्यांची वेबसीरिजही प्रचंड गाजली. यात त्यांनी कालीन भैय्याची भूमिका साकारली होती. लवकरच या वेबसीरिजचे दुसरे सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पंकज त्रिपाठी या हरहुन्नरी अभिनेत्याला न ओळखणारा विरळाच. गत महिन्यांत पंकज त्रिपाठी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘लुका-छुपी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे आणि अशाच पंकज त्रिपाठी यांनाही राजकारणाचे वेध लागले आहे.
होय, अलीकडे एका मुलाखतीत पंकज यांना राजकारणात येण्याबद्दल विचारले गेले. यावर ‘कालीन भैय्या’नी कुठलीही लपवाछपवी न करता राजकारणात येण्याची इच्छा बोलून दाखवली. मला राजकारणात रस आहे. पण सध्या मी माझी ही इच्छा दाबून ठेवली आहे, असे ते म्हणाले.

राजकारण करण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे. माझ्यामते, एक चांगला शिकलेला, सुसंस्कृत व्यक्ती महान नेता बनू शकतो आणि राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावू शकतो. मी प्रचंड वाचन करतो आणि एक विचारधारा बाळगतो. माझ्या मते, वाचन आणि प्रवास तुम्हाला केवळ एक उत्तम अभिनेताच बनवत नाही तर चांगली व्यक्ती म्हणूनही तुम्हाला घडवते, असे ते म्हणाले.

एकंदर काय तर ‘कालीन भैय्या’कडे राजकारणात येण्यासाठी वेळ आहे, विचारांची दिशा आणि शिवाय राजकारणाला दिशा देण्याचे ‘हुनर’ही आहे. देर आहे ती केवळ त्यांनी आपल्या इच्छेला मूर्तरूप द्यायची.
पंकज त्रिपाठी यांनी अनेक हिट चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. स्त्री, गँग आॅफ वासेपूर, बरेली की बर्फी, न्यूटन, मसान, फुकरे, निल बटे सन्नाटा, लुका-छुपी अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलीत. गतवर्षी आलेली ‘मिर्झापूर’ ही त्यांची वेबसीरिजही प्रचंड गाजली. यात त्यांनी कालीन भैय्याची भूमिका साकारली होती. लवकरच या वेबसीरिजचे दुसरे सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: pankaj tripathi wants to join politics but fans have to wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.