Before pandya there has been wrong statement in koffee with karan show, ranveer’s remark irks controversy | हार्दिक पांड्याआधी कॉफी विथ करणमध्ये झालेली ‘गंदी बात’, रणवीरचं अनुष्का, करीनाबाबत वादग्रस्त विधान
हार्दिक पांड्याआधी कॉफी विथ करणमध्ये झालेली ‘गंदी बात’, रणवीरचं अनुष्का, करीनाबाबत वादग्रस्त विधान

कॉफी विथ करण शोमध्ये हार्दिक पांड्याच्या विधानावरून निर्माण झालेलं वादळ शमलं नसतानाच आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. कॉफी विथ करण शोमधील रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह वादग्रस्त विधान देत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये रणवीर अनुष्काकडे पाहून अश्लील टिपण्णी करत आहे. अनुष्काचा चिमटा घ्यावा वाटतो असं विधान रणवीरने केले. त्याचे हे विधान पाहून अनुष्काला धक्का बसला. तिने रणवीरला तिने मैत्रीपूर्ण पद्धतीने फटका मारत गप्प राहण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये रणवीरने बॉलीवुडची बेगम करीना कपूर खान हिच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. सिम्बा स्टार या व्हिडीओमध्ये जुन्या आठवणीत रमला आहे. यांत तो आपल्या अफेअर्सबाबत बोलत आहे. यावेळी रणवीर करीनाशी संबंधित एक किस्सा सांगत आहे. 

रणवीरच्या मते तो आणि करीना एकाच क्लबमध्ये जात असत. तिथं करीनाला पोहताना पाहून बाल रणवीरमधील मुलगा जागा होत असे असं रणवीर सांगू लागला. रणवीर हे सांगत असताना अनुष्का त्याच्याकडे तो कसं काय म्हणतोय या नजरेने पाहते आहे. यावेळी रणवीरचे हे विधान ऐकून करणने त्याला हटकलं. करीना माझ्यासाठी बहिणीप्रमाणे आहे आणि त्यामुळे तुझ्या या विधानामुळे मी नाराज होईन असं करणने त्याला सांगितलं. या व्हिडीओवर आणि रणवीरच्या विधानावर सोशल मीडियातून फॅन्सकडून संताप व्यक्त होत आहे. 


Web Title: Before pandya there has been wrong statement in koffee with karan show, ranveer’s remark irks controversy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.