'This' Pakistani actress Ali Zafar charged with sexual harassment! | ​‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने अली जफरवर लावला लैंगिक शोषणाचा आरोप!

हॉलिवूडची सर्वाधिक चर्चित मोहिम ‘Mee Too’ आता पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. होय, एक पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्रीने पाकचा लोकप्रीय गायक आणि अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाविरोधात अशी ठोस भूमिका घेतल्याने पाकिस्तानातील अन्य महिलाही जागृत होतील आणि स्वत:वरील अत्याचाराविरोधात जगासमोर येण्याची हिंमत दाखवतील, अशी या पाकी अभिनेत्रीची अपेक्षा आहे.


ही पाकिस्तानी गायिका व अभिनेत्री कोण तर मीशा शफी. होय, मीशा शफीने सोशल मीडियावर आपली आपबीती सांगितली आहे. टिष्ट्वटरवर एक मोठी पोस्ट लिहून मीशाने पाकिस्तानी गायक व अभिनेता अली जफर याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.मीशाने लिहिलेय की, ‘मी माझ्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात पहिल्यांदा बोलतेय. जेणेकरून अशा घटनांवरील समाजाची चुप्पी तोडली जाऊ शकेल. लैंगिक शोषणासारख्या घटनांवर उघडपणे बोलणे सोपे नसते. पण आता मला शांत राहणे अशक्य आहे. माझे मन मला आणखी शांत राहण्याची परवानगी देत नाहीये. मी एकदा नाही तर अनेकदा लैंगिक शोषणाची बळी ठरले. मी तरूण होते  किंवा पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीत नवखी होते, तेव्हा नाही तर मी एक सशक्त स्त्री म्हणून ओळखली जात असताना, परखड बोलण्यासाठी, स्वतंत्र विचारांसाठी ओळखली जात असताना, दोन मुलांची आई असताना,अली जफरने माझे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर मला प्रचंड मानसिक त्रासातून जावे लागले. माझ्या कुटुंबालाही मानसिक त्रास सहन करावा लागला. अलीसोबत मी काम केले आहे.स्टेजवर तो माझा सहकलाकार होता. पण त्याच्या वागण्याने मी हादरले. मी माझ्या या पोस्टद्वारे पाकिस्तानी मुलींना हेच सांगू इच्छिते की, शांत बसू नका. स्वत:वरच्या अशा अत्याचाराविरूद्ध आवाज उठवा.’ 

ALSO READ : OMG ! ​पुन्हा एकदा स्मोकिंग करताना दिसली माहिरा खान!!

मीशाला कोक स्टुडिओद्वारे लोकप्रीय झालेल्या‘आया लारिसे’ आणि ‘भोले भाले’ या गाण्यांसाठी ओळखले जाते. साऊथ एशियात तिचे असंख्य चाहते आहेत.
अली जफर हा पाकिस्तानचा लोकप्रीय अभिनेता आहे. बॉलिवूडच्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’,‘तेरे बिन लादेन’,‘चश्मे बद्दूर’,‘टोटल सियापा’,‘डियर जिंदगी’ अशा चित्रपटात तो दिसला आहे.
Web Title: 'This' Pakistani actress Ali Zafar charged with sexual harassment!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.