Pakistan imposes ban on 'Padman'? | ​पाकिस्तानने का लादली ‘पॅडमन’वर बंदी?

‘पॅडमॅन’ला भारतात प्रेक्षक व समीक्षकांनी चांगलीच दाद दिली असतानाच आपल्या शेजारी देशाने मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादली आहे. होय, पाकिस्तानने या ‘पॅडमॅन’वर बंदी लादली आहे. विशेष म्हणजे, ही बंदी लादताना पाकिस्तानने नेहमीप्रमाणे विचित्र कारण समोर केले आहे. अर्थातच चित्र-विचित्र कारण देऊन भारतीय चित्रपटांवर बंदी लादण्याची पाकिस्तानची जुनी खोड आहे. आता पाकने पुन्हा एकदा असेच काही कारण पुढे केले आहे. ज्या चित्रपटात भारताचे गुणगान केले गेलेयं, त्या चित्रपटाला पाकिस्तानात थारा नाही, असे पाकने म्हटले आहे. याशिवाय ‘पॅडमॅन’ हा चित्रपट पाकिस्तानची सभ्यता व संस्कृतीच्या विरूद्ध आहे,असा एक युक्तिवादही पाकने केला आहे. आमच्या धर्मात जो विषय वर्जित आहे. तो विषय चित्रपटगृहांत दाखवला जाऊ शकत नाही, असेही पाकने म्हटले आहे. आता पीरियड्ससारख्या विषयाने  सभ्यता व संस्कृती कशी धोक्यात येऊ शकते, याचे उत्तर तर केवळ पाकिस्तानचं देऊ शकते.
दरम्यान ‘पॅडमॅन’बंदीनंतर पाकिस्तानात काही बंडाचे सूरही उमटू लागले आहे. पाकिस्तानची एक लोकप्रीय टीव्ही अँकर रूबिका लियाकत हिने ‘पॅडमॅन’ बंदीवर टीका केली आहे. ‘हाफिज सईद चलेगा, पीरियड्स नहीं,’ असे टिष्ट्वट तिने केले आहे. लियाकतच्या या टिष्ट्वटवर पाकिस्तानी लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. निश्चितपणे काही लोकांनी या बंदीचे समर्थन केले आहे तर काहींनी ही बंदी गैर असल्याचे म्हटले आहे. ‘पाकिस्तान जैसा देश, जिनके हाथ खून से रंगे हुए हैं, वो आज पीरियड्स के खून से डर रहे हैं’, असे एका युजरने लिहिले आहे.
भारतात या चित्रपटाने गत दोन दिवसांत २३ कोटींचा बिझनेस केला आहे.  

ALSO READ : पाचशे लोकांमधून निवडण्यात आली अक्षयकुमार-राधिका आपटेची शेजारीन!
Web Title: Pakistan imposes ban on 'Padman'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.