Padmavati poster was released on the first day of 'Navaratri' | ​‘या’ खास कारणामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी जारी केले गेले ‘पद्मावती’चे पोस्टर!

आजपासून (२१ सप्टेंबर) नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आणि नवरात्रोत्सवाचा आजचा पहिला दिवस सिनेप्रेमींसाठी एक सरप्राईज घेऊन उगवला. होय, ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करताहेत, त्या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. आम्ही कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोयं, हे नव्याने सांगायची गरज नाहीच. 
नवरात्रीच्या पहिल्या दिवसासोबत संजय लीला भन्साळींच्या बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’चे पहिले पोस्टर आले आणि या पोस्टरला सिनेप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 
काल नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘पद्मावती’चा लोगो जारी केला गेला होता. सोबतच ‘ रानी पद्मावती पधार रही हैं. कल सूर्योदय के साथ’ अशा शाही थाटात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज  पहाटेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर आज हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर भरजरी दागिने अशा शाही अंदाजात राणी पद्मावतीच्या रूपातील दीपिका पादुकोणला पाहून तर सगळेच मोहित झाले. पण हे पोस्टर रिलीज करण्यासाठी भन्साळींनी आजचाच दिवस का निवडला, यामागेही एक किस्सा आहे.ALSO READ : ‘पद्मावती’चा धमाका!! जॉन अब्राहमच्या ‘परमाणु’ने घेतला धसका!!

खरे तर राणी पद्मावती म्हणजे जगातील सर्वाधिक सुंदर महिला. तिचे किस्से आजही चित्तोडगडमध्ये ऐकवले जातात. आजही येथील लोकगीतांमध्ये महाराणी पद्मिनी उर्फ पद्मावती जिवंत आहे. महाराणी पद्मिनीला चित्तोडगडमध्ये देवीच्या रूपात पुजले जाते. दिल्लीचा सुल्तान खिल्जी याने चित्तोडगडचा राजा व पद्मावतीचा पती राजा रतन सिंह याला ठार केले आणि हळूहळू तो राज्यातील सर्व पुरूषांचा ठार मारत पुढे येतोय, हे ऐकताज राणी पद्मावतीने स्वत:ला अग्निकुंडात झोकून दिले. स्वत:ची आणि आपल्या प्रजेतील महिलांची अब्रू वाचवण्यासाठी तिने हे पाऊल उचलले. महाराणी पद्मावतीच्या या महान त्यागामुळे तिला संपूर्ण भारतात पुजले जाते. याच कारणामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘पद्मावती’चे पोस्टर जारी केले गेले आणि या पोस्टरवर अन्य कलाकारांऐवजी केवळ राणी पद्मावती अर्थात हे पात्र साकारणा-या दीपिकाला फोकस केले गेले. नवरात्रात देवीची आराधना केली जाते आणि त्यामुळेच भन्साळी आपल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यासाठी हे मुहूर्त शुभ समजले.
Web Title: Padmavati poster was released on the first day of 'Navaratri'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.