संजय लीला भन्साळींचा बहुप्रतीक्षीत चित्रपट ‘पद्मावती’ कायम चर्चेत आहे. मग ते चित्रपटाच्या ‘फर्स्ट’ पोस्टरमधील दीपिकाचा युब्रो लूक असो, रणवीर सिंगचा अलाऊद्दीन खिल्जी गेटअप असो किंवा मग शाहिद कपूरचा राजपूताना बाणा असो. चित्रपटातील पात्र, त्यांचे लूक सगळेच सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. चित्रपटाचे ट्रेलरही तसेच चर्चेत आहे. पहिल्या २४ तासांत पहिल्या २४ तासांत या चित्रपटाने १.५ कोटी व्ह्युज मिळवले. युट्यूबवर आतापर्यंत ‘पद्मावती’चा ट्रेलर २ कोटींवर युजर्सनी पाहिला. आता या चित्रपटाच्या स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचाही खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर, ‘पद्मावती’साठी रणवीर, दीपिका, शाहिद व अन्य कलाकारांनी तगडी रक्कम वसूल केली आहे. चर्चा खरी मानाल तर या चित्रपटाचे बजेट १३० ते १४० कोटी रुपए आहे. यात सर्वाधिक मोठा वाटा, कलाकारांच्या मानधनाचा आहे, असेच म्हणावे लागेल. कारण चित्रपटातील अनेकविध भूमिकांसाठी कलाकारांनी कोटीच्या घरात फी घेतली.  अर्थात फी संदर्भातील हा आकडा अधिकृत नाही. कारण मेकर्सने त्याला दुजोरा दिलेला नाही.‘पद्मावती’त राणी पद्मावतीची भूमिका जिवंत करणार असणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेतल्याचे कळते. या चित्रपटासाठी तिला ११ कोटी रूपयांचे मानधन मिळाले आहे.अलाऊद्दीन खिल्जीच्या व्यक्तिरेखेत जीव ओतणाºया आणि आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना भारावून सोडणाºया रणवीर सिंगने या भूमिकेसाठी ८ कोटी रुपए घेतल्याचे समजते.राजा महारावल रतन सिंह ही व्यक्तिरेखा साकारणा-या शाहिद कपूरला या चित्रपटासाठी ६ कोटी रुपए मिळाले आहेत.

ALSO READ : OMG!! ​‘पद्मावती’च्या ट्रेलर रिलीजनंतर नाराज तर नाही शाहिद कपूर ?अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ती यात मेहरूनिशांची भूमिका साकारणार आहे. या रोलसाठी अदितीने ८५ लाख रुपए घेतले आहे.‘नीरजा’ फेम अभिनेता जिम सरब हा सुद्धा ‘पद्मावती’त दिसणार आहे. यात जिम अलाऊद्दीन खिल्जीचा जवळचा सहकारी मलिक काफूरच्या भूमिकेत दिसणार आहे. जिमने या भूमिकेसाठी ७० लाख रुपए मानधन घेतल्याचे कळते.


 
Web Title: Padmavati artists took a strong fee! Know how much?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.