'Padman' throws up Siddharth Malhotra Such a blast !! | ​‘पॅडमॅन’ने आणला सिद्धार्थ मल्होत्राला राग; अशी काढली भडास!!

चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष आता नेहमीचाच झालाय. आता तर या बॉक्सआॅफिस संघर्षामुळे बॉलिवूडच्या कलाकारांमध्येही ‘संघर्ष’ वाढू लागलायं. ताजे उदाहरण द्यायचे तर सिद्धार्थ मल्होत्राचे देता येईल. होय, बॉक्सआॅफिस क्लॅशमुळे सिद्धार्थ म्हणे अक्षय कुमारवर जाम भडकला आहे. अप्रत्यक्षपणे त्याने त्याची ही नाराजी बोलूनही दाखवली आहे. सिद्धार्थचा ‘अय्यारी’ चित्रपट येत्या ९ फेबु्रवारीला रिलीज होतो आहे. नेमक्या याच दिवशी अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ ही प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. नेमक्या याचमुळे सिद्धार्थ भडकला आहे.खरे तर ‘अय्यारी’हा चित्रपट उद्या २६ जानेवारीला रिलीज होणार होता. पण ‘पद्मावत’ २५ जानेवारीला रिलीज होणार हे ठरले आणि ‘अय्यारी’चे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत ९ फेबु्रवारी ही तारीख निवडली. ही तारीख निवडताना आपल्या चित्रपटासोबत दुसरा कुठलाही मोठा चित्रपट नसणार, ही अपेक्षा नीरज पांडे व टीमला होती. पण झाले भलतेच. ‘पद्मावत’ची रिलीज डेट येताच अक्षय कुमारनेही आपल्या ‘पॅडमॅन’ची रिलीज डेट लांबणीवर टाकत ९ फेबु्रवारी ही तारीख लॉक केली. म्हणजे आता ‘अय्यारी’ विरूद्ध ‘पॅडमॅन’ असा सामना बॉक्सआॅफिसवर असणार आहे. सिद्धार्थ नेमक्या याच कारणाने संतापला आहे. आम्हाला सोलो रिलीज मिळेल, म्हणून आम्ही आमच्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली होती. पण पुन्हा ‘पॅडमॅन’मुळे दोन्ही चित्रपटांना नुकसान सोसावे लागणार आहे, असे सिद्धार्थने म्हटले आहे. एकंदर अप्रत्यक्षपणे सिद्धार्थने अक्षयवर आपली भडास काढली आहे.

ALSO READ : अभिनेत्री नीतू चंद्रा संतापली...सिद्धार्थ मल्होत्राला मागावी लागली माफी! वाचा संपूर्ण प्रकरण!!

अक्षय कुमार व सिद्धार्थ या दोघांनी ‘ब्रदर’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या अ‍ॅक्शनपटात सिद्धार्थ एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी हा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिद्धार्थ यात एक आर्मी आॅफिसर साकारणार आहे. यापूर्वी आलेले सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट धडाधड आपटले होते. ‘बार बार देखो’, ‘ए जेंटलमॅन’, ‘इत्तेफाक’ हे सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकले नाहीत.  
Web Title: 'Padman' throws up Siddharth Malhotra Such a blast !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.