'Padman' Cinema Displays the date of expiry, now will be displayed on this date | 'पॅडमॅन' सिनेमा प्रदर्शनाची तारीख लांबणीवर, आता या तारखेला होणार प्रदर्शित

बहुप्रतिक्षित सिनेमा पदमावत येत्या 25 तारखेला प्रदर्शित होणार आहे.याच दिवशी अक्षय कुमारचा पॅडमॅनही प्रदर्शित होणार होता. मात्र आता दोन्ही सिनेा एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे पॅडमॅन सिनेमा माघार घेतली आहे. आता हा सिनेमा 9 फ्रेबुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांचा बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष मिटला आहे.ही माहिती नुकतीच अक्षय कुमारने पत्रकार परिषदेत  दिली.'पद्मावत' हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली होती.हा चित्रपट आता २5 जानेवारीला प्रदर्शित होणार असून पॅडमॅन आणि पद्मावती या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर आपल्याला टक्कर पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात होते. पद्मावत या चित्रपटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच वाद सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटातील 'घुमर'... हे गाणे तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.25 तारखेला पॅडमॅनही प्रदर्शित होणार होता. मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवेल असे सगळ्यांना वाटत आहे.त्यामुळे आता अक्षय कुमारच्या पॅडमॅननेही पदमावतचा धसका घेतला असून आता पॅडमॅन 9 फ्रेबुवारीलाच रसिकांच्या भेटीला येणार आहे.तसेच पॅडमॅन प्रमाणे अय्यारी सिनेमाही याच दिवशी प्रदर्शित होणार होता.मात्र पॅडमॅन आणि पद्मावत यांच्यापुढे अय्यारी सिनेमाची जादु फिकी पडणार हे जाणवताच निर्मात्यांनी अय्यारी सिनेमाची तारिख पुढे ढकलत  ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र आता पुन्हा अय्यारी सिनेमाला पॅडमॅनच्या समोर कितपत निभाव लागणार त्यामुळे पुन्हा अय्यारी सिनेमा प्रदर्शनाची तारिख आणखी पुढे ढकलण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे. तुर्तास पद्ममावत आणि पॅडमॅन यांचा रूपेरी पडद्यावर टक्कर होणार नाही हे मात्र नक्की.Web Title: 'Padman' Cinema Displays the date of expiry, now will be displayed on this date
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.