Padman Box Office: The first week of Akshay Kumar's 'paddman', downfall, see earnings figures! | Padman Box Office : अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ची पहिल्याच आठवड्यात पडझड, पाहा कमाईचे आकडे!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाने चार दिवसांमध्ये बॉक्स आॅफिसवर केवळ ४५ कोटी रुपयांचीच कमाई केली. ६० कोटी रुपयांचे बजेट असलेला हा चित्रपट सॅनिटरी नॅपकिन या मुद्द्यावर आधारित आहे. चित्रपटाचे प्रेक्षकांबरोबर समीक्षकानेही कौतुक केले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही हा चित्रपट चांगली कमाई करीत आहे. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, ‘पॅडमॅन’ हा अक्षयकुमारच्या गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरत आहे. 

ट्विंकल खन्ना निर्मित ‘पॅडमॅन’ने पहिल्या आठवड्यात (९ ते ११ फेब्रुवारी) ४० कोटी रुपयांची कमाई केली. २०१५ ते २०१८ या दरम्यान अक्षयकुमारचे सात चित्रपट रिलीज झाले. त्या तुलनेत वीकेण्डमध्ये ‘पॅडमॅन’ सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अक्षयच्या या सात चित्रपटांच्या वीकेण्डमधील कमाईवर नजर टाकली असता ही बाब लक्षात येईल. 

१- टॉयलेट एक प्रेम कथा (२०१७) - ४९.०९ कोटी
२- जॉली एलएलबी-२ (२०१७) - ४७.५९ कोटी
३- रु स्तम (२०१६) - ४९.५३ कोटी 
४- हाउसफुल-३ (२०१६) - ५३.२७ कोटी
५- एयरलिफ्ट (२०१६) - ४२.५७ कोटी
६- सिंग इज ब्लिंग (२०१५) - ४४.२३ कोटी
७- ब्रदर्स (२०१५) - ४७.४२ कोटी

आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे अक्षयच्या या सात चित्रपटांमध्ये ‘सिंग इज ब्लिंग’ आणि ‘ब्रदर्स’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप कॅटेगिरीत मोडतात. त्यामुळे ‘पॅडमॅन’ची कमाई या फ्लॉप चित्रपटांपेक्षा कमी असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, ‘पॅडमॅन’नंतर अक्षयकुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. रिमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’चे प्रोड्यूसर म्हणून रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे काम बघत आहेत. ‘गोल्ड’ या चित्रपटातून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. या चित्रपटात अमित साध हादेखील बघावयास मिळत आहे. 
Web Title: Padman Box Office: The first week of Akshay Kumar's 'paddman', downfall, see earnings figures!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.