'Padman' ban on Pakistan, 'Hafiz Saeed to run but not a menstrual cycle'! | ‘पॅडमॅन’ला पाकिस्तानात बंदी, ‘हाफिज सईद चालणार पण मासिक पाळी नाही’!

महिलांची मासिक पाळी या विषयावर आधारित अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली. परंतु यामुळे एका न्यूज चॅनलच्या अ‍ॅँकर रूबिका लियाकत यांनी पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले. रूबिका यांनी ट्विट करून लिहिले की, ‘हाफिज सईद चालणार पण परियड्स नाही’. रूबिका यांनी टीव्ही पॅनलिस्ट सोनम डोगरा यांच्या ट्विटला रिट्विट करताना आपले म्हणणे मांडले. सोनम डोगराने ट्विट करून लिहिले होते की, ‘पाकिस्तानात पॅडमॅन बॅन, सेन्सॉर बोर्ड म्हणतो की, चित्रपटात मासिक धर्म या विषयावर वायफळ चर्चा घडवून आणली आहे. ही चर्चा आमची परंपरा आणि संस्कृतीच्या विरोधात आहे. यामुळे पाकिस्तानात हा चित्रपट रिलीज केला जाणार नाही.’ खरंच मासिक धर्म संस्कृतीच्या विरोधात आहे काय? वास्तविक यांच्या मते दहशतवाद सोडूच सर्वच संस्कृतीच्या विरोधात आहे.’

रूबिका लियाकतच्या या ट्विटला मोठ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहींनी या ट्विटच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली तर काहींनी त्यावर नाराजी व्यक्त केली. काहींनी तर अतिशय अभद्र अशी टीकाही केली. राजगोपाल नायडू नावाच्या एका यूजरने लिहिले की, ‘हाफिज सईद चालणार, हलाला चालणार, चार लग्न करायलाही चालणार मात्र पीरियड्स नाही.’ एका यूजरने लिहिले की, ‘मुलांवर बलात्कार करणे पाकिस्तानची परंपरा आहे.’ 
 }}}} ">Hafiz saeed chalega lekin ‘Periods’ nahi ... https://t.co/nFcIi7KV3i

— Rubika Liyaquat (@RubikaLiyaquat) February 10, 2018
डॉक्टर सिंघम नावाच्या अकाउंटवरून लिहिले की, ‘पाकिस्तानसारखा देश, ज्याचे हात रक्ताने माखलेले आहेत त्याला आज मासिक पाळीच्या रक्ताची भीती वाटत आहे.’ रेनूने लिहिले, ‘पॅडमॅनसारखे चित्रपट महिला सशक्तिकरणाऐवजी त्यांचे चिरहरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ आदीने लिहिले, ‘काही गोष्टी पडद्यापर्यंतच मर्यादित राहणे योग्य आहे. सर्वांना सर्व काही माहिती असते, त्याची दवंडी पिटण्याची गरज नाही.’ अजय पांडेने लिहिले, ‘पाकिस्तानच्या जर मनात आले तर शरियतच्या नावावर मुस्लीम महिलांच्या मासिक पाळीवर ते बंदी आणतील.’

वास्तविक पाकिस्तानात ‘पॅडमॅन’वर बंदी घालणे अगोदरपासूनच अपेक्षित होते. कारण या देशात संकुचित विचारसरणीच्या लोकांचा भरणा असल्याने ते हा चित्रपट दाखविण्यास कधीच समर्थता दर्शविणार नाहीत, अशी शंका सुरुवातीपासूनच वर्तविली जात होती. 
Web Title: 'Padman' ban on Pakistan, 'Hafiz Saeed to run but not a menstrual cycle'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.