-रवींद्र मोरे 
चित्रपट जगताची झगमग सर्वांनाच आकर्षित करते, मात्र पडद्यामागचे सत्य खूपच कमी लोकांना माहित असते. स्टार्सचे एकमेकांशी असलेले रिलेशन आणि त्यांच्यात होणारे वाद ही गोष्ट सामान्य लोकांना समजण्याच्या पलिकडची आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींना रिलेशनशिपमध्ये असताना मार तर खावाच लागला शिवाय सेक्सुअल हराशमेंटचाही सामना करावा लागला आहे, ज्यावरुन त्यांचे नाते कायमचे तुटले. आज अशाच काही अभिनेत्रींच्या बाबतीतचा हा वृत्तांत...!     

Related image

* ऐश्वर्या राय
सलमान खान आणि ऐश्वर्या राय या जोडीची चर्चा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक होती. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटापासून सुरु झालेली सलमान आणि ऐशची लव्ह स्टोरीचा शेवट तर खूपच दुखद झाला होता. बातमी अशी होती की, ऐश्वर्याने ब्रेकअप नंतर सलमान वर मारहाणीचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर ऐश्वर्याच्या घरच्यांनी सलमानवर घरात बळजबरीने घुसून आणि धमकी देण्याचा आरोपदेखील केला होता. त्यानंतर त्रस्त होऊन ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.       

Related image

* कंगना राणौत
बॉलिवूड क्वीन कंगना राणौत आपल्या बिनधास्त अंदाजाने ओळखली जाते. असे म्हटले जाते की, कंगनाची आदित्य पांचोलीशी ओळख तिच्या संघर्षाच्या काळापासून झाली होती आणि ती त्याच्यासोबतच राहत होती. मात्र काही काळानंतर कंगनाने आदित्य पांचोलीवर गंभिर आरोप करत तो तिच्याशी अप्रत्यक्षपणे गैरव्यवहार करतो असे जाहिर केले. कंगनाने असे म्हटले होते की, ‘तो प्रसंग खूपच कठीण होता, जेव्हा माझ्याशी शारीरिक दुर्व्यवहार करण्यात आला होता, तो मनुष्य माझ्या वडिलांच्या वयाचा होता जेव्हा त्याने मला मारठोक के ली होती.’ अशा आरोपानंतर मात्र दोघांचे रिलेशन कायमचे तुटले. 

Related image

* प्रीति झिंटा
बॉलिवूडची डिंपल गर्ल अर्थात प्रीति झिंटादेखील या दुखद प्रसंगातून गेली आहे. प्रीति आणि नेस वाडियाचे अफेअर २००५ मध्ये सुरु झाले होते. मात्र प्रीतिच्या फ्लॉप करिअरच्या कारणाने दोघांत खूपच वाद होऊ लागले. त्यातच २०१४ मध्ये प्रीतिने नेसवर मारहाणीचे आरोप लावले होते. त्यानंतर मात्र त्यांचे नाते तुटलेच.

Image result for karishma & sanjay breakup

 * करिश्मा कपूर 
कपूर खानदानची मुलगी करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्पोट झाला आहे. दोघांनी लग्न केले होते आणि ते सुमारे १३ वर्ष सोबत राहिले. मात्र संजय कपूर मारहाण करतो असे करिश्माचे म्हणणे होते. त्यातच संजयने करिश्मावर पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मात्र दोघांत जो दुरावा निर्माण झाला तो कायमचाच.     

Related image

* कॅटरिना कैफ
सलमान आणि कॅटरिना दरम्यानच्या रिलेशनवरुन खूपच चर्चा होत्या. मात्र सलमान एकदा कॅटरिनाच्या ड्रेसवरुन खूपच नाराज झाला होता शिवाय त्यांचा संताप अनावर झाला होता. त्यानंतर मात्र कॅटरिनाने नाराज होऊन सलमानशी ब्रेकअप केला आणि रणबीर सिंहशी रिलेशन बनविले. मात्र काही कारणाने रणबीरसोबतही तिचा बे्रकअप झाला.                 
Web Title: Our unfinished story ...!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.