'Oru Adar Love' actress Gipsa morphed photo leaked! | ​‘ओरू अडार लव’ची अभिनेत्री जिप्साचे morphed फोटो लीक!

‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ हे गाणे आणि या गाण्यातील प्रिया प्रकाश वारियर या मल्याळम अभिनेत्रीच्या खल्लास करणा-या अदांचीच सध्या काय ती चर्चा आहे. या गाण्याच्या निमित्ताने वादाचा एक अंकही गाजला आहे. आता ‘मानिका मलयारा पूवी’ या ट्रेंडिंग गाण्यात दिसलेली जिप्सा बेगम या अभिनेत्रीबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, जिप्सा सायबर क्राईमची शिकार ठरली आहे. जिप्साचे मॉर्फ्ड फोटो कुणीतरी इंटरनेटवर पोस्ट करून ते शेअर केल्याचे उघडकीस आले आहे. खुद्द जिप्साने फेसबुकवर पोस्ट लिहून आपबीती सांगितली आहे. ‘मी सायबर क्राईमला बळी पडलेली पहिली व्यक्ती नाही. पण या कॉन्ट्रोवर्सीचा माझ्यावर कुठलाही फरक पडणारा नाही. कारण मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे.  माझे अश्लिल मॉर्फ्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल करून माझा अपमान करणाºया व्यक्तिबद्दल मी नोंदवलेला निषेध म्हणून माझ्या या पोस्टकडे बघता येईल, असे तिने लिहिले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविणार असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
 मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ‘मानिका मलयारा पूवी’या  गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झाली. अलीकडे प्रिया प्रकाशचे हे गाणेही वादात सापडले  होते. या गाण्यातील काही शब्दांवर आक्षेप नोंदवत, आंध्रप्रदेशच्या हैदराबादेत तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्यात शाळेच्या दिवसांतले प्रेम दाखवले आहे. या गाण्यातील प्रिया प्रकाशची व्हिडिओ क्लिप वाºयाच्या वेगाने व्हायरल झाली होती. या व्हिडिओने प्रिया प्रकाशला तुफान लोकप्रीयता मिळवून दिली.  प्रियाच प्रिया प्रकाश वारियर त्रिशूरची राहणारी आहे. १८ वर्षांची प्रिया बी कॉम फर्स्ट ईअरची विद्यार्थीनी आहे. ‘ओरू अडार लव’ या चित्रपटाद्वारे ती अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय. येत्या ३ मार्चला हा चित्रपट रिलीज होतो आहे. 
Web Title: 'Oru Adar Love' actress Gipsa morphed photo leaked!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.