Only five-fifths of Bollywood's famous actress, know this! | फक्त पाचवीपर्यंत शिकली बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या!

बॉलिवूड कलाकारांची बोलण्याची शैली तसेच त्यांच्यातील प्रासंगिकपणा बघून त्यांचे खूप शिक्षण झाले असावे, असा समज चाहत्यांचा झाल्याशिवाय राहत नाही. परंतु काही कलाकारांबाबत वास्तव मात्र वेगळेच आहे. होय, काही कलाकारांचे जरी त्यांच्या बोलण्या-वागण्यातून शिक्षण कळून चुकत नसले तरी, वास्तवात ते जेमतेमच शिकलेले आहेत. आज आम्ही बॉलिवूडमधील अशाच एक प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. कदाचित वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. होय, अभिनेत्री करिश्मा कपूर केवळ पाचवी शिकली आहे. कदाचित हे वाचून अजूनही तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे. 

आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपटांमध्ये स्वत:चा ठसा उमटविणारी करिश्मा केवळ पाचवी शिकली आहे. कपूर परिवारात सर्वात कमी शिकलेली सदस्य म्हणून करिश्माकडे बघितले जाते. बॉलिवूडमधील नामांकित कुटुंबापैकी एक असलेले कपूर कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. कुटुंबाकडून मिळालेला अभिनयाचा वारसा खूपच कमी वयात पुढे घेऊन जाणारे कपूर कुटुंबातील बºयाचशा सदस्यांचे शिक्षण दहावी किंवा बारावीपर्यंत झाले आहे. मात्र करिश्मा केवळ पाचवीपर्यंतच शिकली आहे. 

करिश्मा कपूरने ‘कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिश्मा इयत्ता सहावीचे शिक्षण घेत होती. परंतु तिला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचे असल्याने तिने तेथूनच शिक्षणाला फुलस्टॉप दिला. तिने अभिनयातच आपल्या करिअरवर भर दिला. त्यामुळे करिश्माला केवळ पाचवीपर्यंतच शिक्षण घेता आले. कदाचित ही बाब अनेकांना माहिती नाही. कारण करिश्माने आपल्या अदाकारीच्या जोरावर अनेक भूमिका गाजविल्या आहेत. आजही करिश्माचा इंडस्ट्रीतील दबदबा कायम आहे. सध्या ती इंडस्ट्रीतून गायब असली तरी तिचे नाव मात्र तिच्या चाहत्यांच्या ओठावर आहे. 
Web Title: Only five-fifths of Bollywood's famous actress, know this!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.