One mistake was costly! Junkie Kapoor lost his hand because of 'this', 'Simba' !! | ​ एक चूक पडली महाग! ‘या’ कारणाने जान्हवी कपूरने हातचा गमावला ‘सिम्बा’!!

रणवीर सिंग स्टारर ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटात सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिची वर्णी लागली, ही बातमी आम्ही तुम्हाला कधीच दिलीय. पण आता या बातमीत एक नवा ट्विस्ट आलायं. होय, ‘सिम्बा’साठी म्हणे श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर हीच मेकर्सची पहिली चॉईस होती, असे आता ऐकायला येतेयं. मेकर्सला जान्हवीचं हवी होती तर अचानक साराची एन्ट्री कशी झाली? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर याचाही खुलासा झाला आहे. होय, या चित्रपटात जान्हवीला कास्ट न करण्यामागे एक अतिशय धक्कादायक कारण समोर आले आहे. मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार, सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघींनाही ‘सिम्बा’ची स्क्रिप्ट दिली गेली होती. मात्र मेकर्सने या दोघींपैकी एकीचे नाव फायनल करण्याआधीच जान्हवीने म्हणे, ती या चित्रपटात दिसणार असल्याची बातमी लीक केली. सगळे काही ठरायच्या आधीच, रणवीर सिंगसोबत पहिल्यांदा काम करणार असल्याने मी खूप नव्हर्स आहे, या व अशा अनेक प्रतिक्रिया देण्याचा सपाटाही तिने सुरु केला. चर्चा खरी मानाल तर हीच चूक जान्हवीला महाग पडली आणि मेकर्सनी ऐनवेळी  या चित्रपटासाठी जान्हवीऐवजी साराला पसंती दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून ‘सिम्बा’साठी हिरोईनचा शोध सुरू  होता. यादरम्यान अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा झाली. सर्वप्रथम जान्हवी कपूरने ‘सिम्बा’साईन केल्याची बातमी आली. (अर्थातचं स्वत: जान्हवीनेच ही बातमी लीक केली होती.) नंतर इंटरनेट सेन्सेशन व मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर या चित्रपटात दिसणार, अशी चर्चा रंगली. पण सरतेशेवटी साराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिका-याची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेंपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल.

ALSO READ : It's final: अखेर रणवीर सिंगला मिळाली हिरोईन! ‘सिम्बा’मध्ये सारा अली खानची वर्णी!!
Web Title: One mistake was costly! Junkie Kapoor lost his hand because of 'this', 'Simba' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.