One and only Salman was thinking for 'Tiger Zindagi Hai' - Ali Abbas Zafar | ‘टायगर जिंदा है’साठी वन अँड ओन्ली सलमानचाच विचार होता – अली अब्बास जफर

दबंग सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची केमिस्ट्री असलेला 'टायगर जिंदा है' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. एक था टायगर या सिनेमानंतर तब्बल पाच वर्षांनंतर सलमान-कॅटची रोमँटिक जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या सिनेमाची गाणी रसिकांवर आतापासूनच जादू करत आहेत.सिनेमाच्या ट्रेलरमुळे त्याची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अली अब्बास जफर याच्याशी साधलेला हा संवाद.   

 'टायगर जिंदा है' या सिनेमासाठी सलमान तुझी पहिली पसंती होता?

टायगर जिंदा है या सिनेमासाठी माझी पहिली एकमेव चॉइस फक्त आणि फक्त सलमान हाच होता. सलमानशिवाय दुसरे कोणतंही नाव माझ्या डोक्यात नव्हते हे प्रामाणिकपणे सांगतो.

 
टायगर जिंदा है या सिनेमासाठी सलमानने प्रचंड मेहनत घेतल्याचे पाहायला मिळत आहे,त्याच्या मेहनतीचा किती फायदा झाला?

 

या सिनेमासाठी सलमान खानने प्रचंड मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या शुटिंगच्या तीन महिने आधीपासूनच सलमानने स्वतःला जिममध्ये झोकून दिलं होतं. त्याच्या मेहनतीमुळेच सिनेमातील अनेक स्टंट्स सहजासहजी त्याच्यासोबत आम्ही करु शकलो. शुटिंगच्या दरम्यान कितीही थंडी असली तरी त्याची तमा सलमानने कधीच बाळगली नाही. सलमानने स्नो कॅप घातली असली तरी त्याने फिटनेस आणि ट्रेनिंगकडे दुर्लक्ष केलं नाही. गोठवणारी थंडी असतानाही त्याने सायकलिंग केलं जे या वातावरणात सरळ साधीसोपी गोष्ट नाही. सलमानने दररोज 10 किमी सायकल राईड करायचा, हलकं खानं खायचा आणि तेही अगदी कमी वेळात.

 सलमान आणि कॅटच्या केमिस्ट्रीबद्दल काय वाटतं?

सलमान आणि कॅटरिना कैफची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहायला मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. कारण त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमध्ये अजब जादू आहे. एक था टायगर या सिनेमानंतर टायगर जिंदा है या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांची लाडकी जोडी पाच वर्षांनी एकत्र आली आहे. स्वॅग से स्वागत या गाण्यातील डान्समधील त्यांची केमिस्ट्री तर रसिकांना घायाळ करेल. दोघांच्या केमिस्ट्रीचा या गाण्यातील डान्समध्ये खुबीने वापर करण्यात आला आहे. या गाण्यात 100 डान्सर आहेत. यांत प्रशिक्षित बॅलेनिन, हिप-हॉप, अफ्रो-डान्स हॉल तसंच ग्रीस, फ्रान्स आणि त्रिनिनाद-टोबॅगोचे डान्सर्स स्वॅग से स्वागत या गाण्यात पाहायला मिळतात.

 
यशराज बॅनरचा आणखी एक सिनेमा किती दडपण आणि दबाव होता?


'टायगर जिंदा है' हा सिनेमा बनवताना माझ्या मनावर प्रचंड दडपण होतं. यशराज बॅनजरचा हा बिग बजेट सिनेमा आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे. सिनेमा सुपरडुपर हिट ठरावा आणि निर्मात्यांनी सिनेमात गुंतवलेले पैसे मिळावे असा मला वाटतं. सिनेमातील सीन अधिकाधिक आकर्षक वाटावे यासाठी याचं विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले आहे. मुंबईसह ऑस्ट्रिया आणि अबुधाबीत या सिनेमाचं शुटिंग पार पडलं आहे.

 

सिनेमातील गाणी पुन्हा यशराजच्या हिट गाण्यांची आठवण करुन देतात,तुझं यातील फेव्हरेट गाणं कोणतं ?

यश चोपडा यांना रोमँटिक गाण्यातून श्रद्धांजली देण्याची माझी इच्छा होती. त्यांची गाणी पाहून आणि ऐकून मी वाढलो आहे. त्यांच्या सिनेमातील प्रेमगीतं आजही रसिकांना भावतात. त्यामुळे तसं एखादं गाणं असावं अशी माझी इच्छा होती. हीच माझी इच्छा टायगर जिंदा है या सिनेमातील दिल दियाँ गल्ला या गाण्यामुळे पूर्ण झाली आहे असं मला वाटते. या सिनेमातील हे माझं आवडतं गाणं आहे. यशराज बॅनरच्या अनेक गाजलेल्या गाण्यांप्रमाणे दिल दियाँ गल्ला हे गाणं अनेक पीढ्यांवर जादू करेल असा मला विश्वास वाटतो. शालेय जीवनातील निरागसता आणि दिवसेंदिवस गहिरे होत जाणारे प्रेम यावर हे गाणं आधारित आहे. इरशाद कामिल यांनी हे गीत लिहलं असून विशाल-शेखर यांनी त्याला संगीत दिलं आहे. या गाण्यातून आतिफ असलम आपल्या सुरेल आवाजाने रसिकांवर जादू करेल तर कोरियोग्राफर वैभवी मर्चंटच्या डान्स स्टेप्सही मोहिनी घालतील.  
Web Title: One and only Salman was thinking for 'Tiger Zindagi Hai' - Ali Abbas Zafar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.