Once upon a time Jaya Bachchan and Rake were the best friends | ​एकेकाळी जया बच्चन आणि रेखा होत्या बेस्ट फ्रेंड्स

रेखा आणि जया बच्चन या दोघींनीही सत्तर आणि ऐंशीचे दशक गाजवले आहे. त्या काळातील त्या दोघीही आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्या दोघींच्या नावावर अनेक हिट चित्रपट असून त्या दोघींनी अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. त्या दोघीही समवयस्क असल्याने त्या काळात त्या अनेकवेळा एकमेकींना भेटत असत. खूपच कमी जणांना माहिती आहे की, त्या एकेकाळी एकमेकांच्या खूप जवळच्या मैत्रिणी होत्या. पण आज रेखा आणि जया बच्चन या एकमकेांचे तोंड देखील पाहात नाहीत. एखाद्या कार्यक्रमात एकत्र आल्यास त्या एकमेकींच्या समोर जाणे टाळतात. यासाठी कारण म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांचे जया बच्चन यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांचा सुखी संसार सुरू असतानाच रेखा त्यांच्या आयुष्यात आली. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. जया यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी रेखापासून दोन हात लांब राहाणेच पसंत केले. सिलसिला या चित्रपटात आपल्याला अमिताभ, जया आणि रेखा यांना एकत्र पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील त्या तिघांचा अभिनय, त्यांच्यातील केमिस्ट्री याची प्रचंड चर्चा झाली होती. पण हा या तिघांचा एकत्रित शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर त्यांनी एकमेकांसोबत काम न करणेच पसंत केले. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान देखील रेखा आणि जया एकमेकांशी अजिबातच बोलत नव्हत्या.  
रेखा आणि जया यांच्यात आज कोणतेही नाते नाहीये. पण तुम्हाला माहीत आहे का, एकेकाळी जया आणि रेखा या एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या दोघी एकच रूम शेअर करायच्या असे देखील म्हटले जाते. एवढेच नव्हे तर रेखा प्रेमाने जयाला दीदीभाई असे म्हणायची. पण काही वर्षांनंतर सगळे काही बदलले. रेखा आणि अमिताभ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची जोडी तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. रेखा आणि अमिताभ यांच्या पहिल्या भेटीतच रेखा अमिताभ यांना पाहून प्रभावित झाली होती. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा जयाच्या कानावर आल्यावर जया यांनी रेखासोबत असलेली आपली मैत्री तोडली.  

Also Read : केवळ इतकाच होता अमिताभ बच्चन यांचा पहिला पगार
Web Title: Once upon a time Jaya Bachchan and Rake were the best friends
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.