OMG !! What is the name of Raima Sen talking to 'Nukemars' coming to Bollywood? | OMG !! ​बॉलिवूडमध्ये येणा-या ‘न्युकमर्स’ला उद्देशून हे काय बोलून गेली रायमा सेन?

हिंदी व बंगाली चित्रपटांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रायमा सेन हिने बॉलिवूडसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दिग्दर्शकासोबत झोपल्याने बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य रायमाने केले आहे. #MeToo  या महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात जगभर उभ्या राहिलेल्या अभियानासंदर्भात तिने हे वक्तव्य केले. या अभिनयाच्या संदर्भाने एका ताज्या मुलाखतीत रायमा बोलत होती. ‘सगळ्यांचे आपआपले विचार असतात. पण यशाला कुठलाही शॉर्टकट असू शकत नाही, हे सगळ्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. दिग्दर्शकासोबत झोपल्याने चित्रपट मिळतील, असा काहींचा समज असेल तर हा फंडा चालणारा नाही,’ असे रायमा या मुलाखतीत म्हणाली. सुदैवाने मला कुठल्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला नाही, असेही तिने स्पष्ट केले. ‘यंगस्टर्स नॉन फिल्मी घरातून येतात आणि मग कास्टिंग काऊचसारख्या गोष्टीत अडकतात. कदाचित इंडस्ट्रीत कसे काम चालते, हे त्यांना ठाऊक नसते. या यंगस्टर्सनी ही व्यवस्था, इथले वातावरण समजून घेण्याची गरज आहे. कास्टिंग काऊच केवळ बॉलिवूडमध्येचं नाही तर सर्वच क्षेत्रात आहे. पण बॉलिवूडमध्ये सर्वाधिक टॅलेंट खपते. तुमच्याजवळ टॅलेंट असेल तर बॅकअप प्लानही असेल. पण टॅलेंटचं नसेल तर स्वत:वर विश्वासही नसेल,’ असेही ती म्हणाली.

ALSO READ : रायमा म्हणते, तर बॉलिवूडमध्ये टिकणे कठीण

रायमा सेनने ‘दमन’, ‘परिणीता’, ‘सी कंपनी’, ‘तीन पत्ती’,‘बॉलिवूड डायरिज’अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. अनेक बांगला चित्रपटातही तिने यादगार भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात अशी ओळख असलेल्या रायमाने १९९९ मध्ये ‘गॉडमदर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला. पण या चित्रपटात शबाना आझमीपुढे रायमाची भूूमिका काहीशी फिकी पडलेली दिसली. यानंतर ती रवीना टंडनसोबत ‘दमन’ मध्ये दिसली.
Web Title: OMG !! What is the name of Raima Sen talking to 'Nukemars' coming to Bollywood?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.