OMG! 'Viral Girl' Priya Prakash Warriar had to miss the price; Leave Home Remembers !! | OMG! ‘व्हायरल गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरला चुकवावी लागली मोठी किंमत; सोडावे लागले राहते घर!!

एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनलेली डेब्यूटंट मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअरच्या अदांनी सगळ्यांना घायाळ केलेयं. तिच्या एका व्हिडिओ क्लिपने जगभरात धूमाकुळ घातला आहे. व्हॅलेन्टाईन वीकमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडिओने प्रियाला जगातील तिसरी सर्वाधिक लोकप्रीय इन्स्टाग्राम सेलिब्रिटी बनवले आहे. आता या लोकप्रीयतेने प्रिया प्रकाश किती आनंदी आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण तिचे कुटुंब मात्र या सगळ्यामुळे तितकेच नाराज दिसतेय. प्रियाच्या आईने लेकीला मिळत असलेल्या या लोकप्रीयतेवर चुप्पी तोडली आहे.
www.thenewsminute.com या संकेतस्थळाशी बोलताना प्रियाची आई प्रीथा यांनी हा सगळा प्रकार चिंतीत करणारा असल्याचे म्हटले आहे. प्रियाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर तिला होस्टेलवर पाठवण्यात आल्याचेही प्रीथा यांनी सांगितले. प्रियाला होस्टेलवर का पाठवले? असे विचारले असता, त्यांनी आपली चिंता बोलून दाखवली. एका रात्रीत प्रियाला मिळालेली लोकप्रीयता बघून मी घाबरले आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाच्या रिलीजपूर्वी प्रियाला कुठलीही मुलाखत न देण्याचे बजावले आहे.  प्रियाच्या चित्रपटाचे शूटींग नुकतेच सुरू झाले आहे. काही मोजकेच सीन्स शूट झाले आहेत. त्याआधीच प्रिया इतकी लोकप्रीय झालेली पाहून मी तिला होस्टेलवर पाठवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. 

ALSO READ : ​‘इंटरनेट सेन्सेशन’ प्रिया प्रकाश वारियरला नकोय बॉयफ्रेन्ड! वाचा काय आहे कारण!!

प्रिया एका रात्रीत स्टार होईल, याची मी कल्पनाही केली नव्हती. प्रियाला अभिनय आवडत होता. म्हणून आम्ही तिला एका आॅडिशनला घेऊन गेलो होतो. गतवर्षी तिचे आॅडिशन झाले तेव्हा ती १२वीत होती. या आॅडिशनमध्येही प्रिया सिलेक्ट झाली. पण बोर्डाच्या परिक्षेमुळे ती शूटींगवर जावू शकली नव्हती. त्यावेळी फिल्ममेकरने तिला नव्या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी तयार राहा, असे सांगितले होते.
एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली आहे. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले आहे. पण प्रियाच्या आईचे मानाल तर प्रियाचे कुठलेही आॅफिशिअल इन्स्टा अकाऊंट नाहीये. सोशल मीडियावर तिच्या नावाचे सगळे अकाऊंट फेक असल्याचे तिच्या आईने म्हटले आहे.
Web Title: OMG! 'Viral Girl' Priya Prakash Warriar had to miss the price; Leave Home Remembers !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.