OMG: 'Veer The Wedding' got 'A' certificate; Censor board decision due to pornographic conversation! | OMG : ‘वीरे दी वेडिंग’ला मिळाले ‘ए’ सर्टिफिकेट; अश्लील संवादामुळे सेन्सॉर बोर्डाचा निर्णय!

लग्नानंतर अभिनेत्री सोनम कपूरचा पहिला चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ येत्या १ जून रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र तत्पूर्वीच चित्रपटाला एक मोठा झटका बसला आहे. होय, शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने चक्क ए सर्टिफिकेट दिले आहे. सेन्सॉरच्या मते हा चित्रपट अ‍ॅडल्ट आहे. चित्रपटात मोठ्या प्रमाणात अश्लील भाषेचा वापर केला गेला आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या मते तर, हल्ली तरुण मंडळी ज्यापद्धतीच्या भाषेचा वापर करते अगदी तशीच भाषा चित्रपटात वापरली आहे. त्यामुळेच या चित्रपटाला अ‍ॅडल्टचा दर्जा दिला गेला असावा. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाला अ‍ॅडल्टचा दर्जा दिल्यावरून निर्मात्या एकता कपूर आणि रिया कपूरला काहीही आश्चर्य वाटले नाही. कारण जर चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले गेले आहे, तर त्यात कुठल्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत. शिवाय कुठल्याही दृश्याला कात्री लावण्याची गरज पडणार नाही. निर्मात्यांच्या मते, चित्रपट जसा बनविला अगदी तसाच तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला जावा. त्यात कुठल्याही प्रकारची छेडछाड केली जाऊ नये. 

रिपोर्ट्सनुसार, सेन्सॉर बोर्डाचे सदस्य चित्रपटातील चार अभिनेत्रींनी वापरलेल्या भाषेच्या तीव्र विरोधात होते. मात्र एकता कपूरचे वडील जितेंद्र आणि रिया व सोनमचे वडील अनिल कपूर यांच्या मते चित्रपटातील कुठल्याही दृश्याला कात्री लावली जाऊ नये. कारण चित्रपटात ज्याप्रकारच्या भाषेचा वापर केला आहे, ती भाषा आजकालच्या तरुणाईच्या तोंडी नेहमीच ऐकावयास मिळते. यासर्व बाबींचा विचार करून सेन्सॉरने चित्रपटाला ए सर्टिफिकेट दिले. चित्रपटात सोनम व्यतिरिक्त करिना कपूर-खान, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
Web Title: OMG: 'Veer The Wedding' got 'A' certificate; Censor board decision due to pornographic conversation!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.