OMG! Two news for fans of Kapil Sharma A good and bad one !! | OMG! ​कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी दोन बातम्या! एक चांगली अन् एक वाईट!!

कपिल शर्मा सध्या बेंगळुरूच्या होलिस्टिक हेल्थकेअर सेंटरमध्ये आयुर्वेदीक उपचार घेतोय, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. पण आता कपिलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, कपिलला या हेल्थ केअर सेंटरमधून डिस्चार्ज झालाय. आता रूग्णालयातून डिस्चार्ज म्हटल्यावर कपिल पुन्हा एकदा नव्या जोशात टीव्हीवर परतणार, असा तुमचा अंदाज असेल तर पुढे तुमचा हिरमोड करणारी बातमी आहे. होय, कारण कपिल बेंगळुरूवरून परतला असला तरी तूर्तास त्याचा शो परतणार नाहीयं. कपिलच्या एका जवळच्या व्यक्तिने दिलेल्या माहितीनुसार, कपिलला सध्या विश्रांतीची गरज आहे. जेणेकरून तो त्याचाअपकमिंग सिनेमा ‘फिरंगी’चे योग्यप्रकारे प्रमोशन करू शकते. त्यामुळे इतक्यात तरी कपिलचा शो सुरू होईल, याच्या शक्यता कमी आहेत.
खरे तर बेंगळुरूच्या या हेल्थ सेंटरमध्ये कपिल ४० दिवस उपचार घेणार होता. पण तो १२ दिवसांतच परत आला आहे. उपचार अर्धवट सोडून परतण्यामागेही ‘फिरंगी’ असल्याचे कळतेय. या चित्रपटाचे काही काम अद्याप बाकी आहे. ते पूर्ण करणे कपिलला भाग आहे.   १२ दिवसांच्या उपचाराचे फलित म्हणाल तर, सूत्रांच्या मते,कपिल आधीपेक्षा चांगले फिल करतोय. आता किती चांगले फिल करतोय, हे तर येत्या काही दिवसांत दिसेलच.

ALSO READ : कपिल शर्मा व गिन्नी चतरथचे ब्रेकअप! किती खरे, किती खोटे!!  

गेल्या काही दिवसांत कपिल शर्माच्या करिअरची गाडी रूळांवरून घसरल्याचे बघायला मिळतेय. कपिल सध्या करिअरच्या सगळ्यात वाईट टप्प्यातून चाललाय, असेही म्हणता येईल. आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला. मग सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला आजारपणाने (?) घेरले. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले.  अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला. माझा शो बंद झालेला नाही तर मी केवळ ब्रेक घेतलायं, असे कपिल सध्या ओरडून ओरडून सांगतोय. पण शेवटी कपिलचा शो कधी परत येईल, हे कपिललाच ठाऊक़
Web Title: OMG! Two news for fans of Kapil Sharma A good and bad one !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.