OMG: Training by Sushant Singh Rajput in NASA | OMG: सुशांत सिंग राजपूत नासामध्ये घेतोय ट्रेनिंग

सुशांत सिंग राजपूतचा राब्ता चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी फारसा6 कमाल दाखवू शकला नसला तरी सध्या सुशांत त्याच्या आगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेताना दिसतो आहे. सुशांत 'चंदा मामा दूर के'साठी सध्या ट्रेनिंग घेतो आहे. त्याचा चित्रपटाला फर्स्ट लुक नुकताचसमोर आला आहे. निर्माता विकी रजनानीने सुशांतचे ट्रेनिंग दरम्यानचे फोटो ट्वीटर शेअर केले आहेत. 'चंदा मामा दूर के'साठी सुशांत नासामध्ये जाऊन ट्रेनिंग घेतो आहे. नासामध्ये जाऊन ट्रेनिंग घेणार सुशांत हा पहिला बॉलिवूड अभिनेता आहे.ALSO READ : ‘चंदा मामा दूर के’साठी हिरोईन मिळेल का हिरोईन?

सुशांतचे नासामधले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. ज्या फोटोंमध्ये सुशांतने स्पेशल किट घातलेले दिसते आहे ज्याला अंतराळात जाणारे अतंराळवीर घालतात. यात चित्रपटातही सुशांत एक अंतराळवीराची भूमिका साकारतो आहे. ज्यासाठी त्याला स्पेशल ट्रेनिंग दिली जाते आहे.यात सुशांतसह नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर माधवन सुद्धा झळकणार आहेत. आर माधवन यात टेस्ट पायलटची भूमिका साकारतो आहे. सुशांत स्वत: इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला नासाला जाण्याबद्दल उत्सुकता होती. चंद्रावरचे जग कसे असेल, याबद्दल त्याला आधीपासून  कुतूहल होते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला एका वेगळ्या जगाबद्दल जाणून घेता येणार होते म्हणून तो उत्सुक होता त्यामुळे त्याची ही उत्सुकता आता संपली असले एवढे नक्की आहे.यानंतर सुशांत केदारनाथ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. अभिषेक कपूर केदारनाथचे दिग्दर्शन करतो आहे. या आधी सारा करण जोहरच्या स्टुडेंट ऑफ द इअरमधून पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. 
Web Title: OMG: Training by Sushant Singh Rajput in NASA
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.