OMG: Timur Ali Khan raised concerns about Saif Ali Khan | OMG : तैमूर अली खानने वाढवली सैफ अली खानची चिंता

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान नेहमी लाईमलाइटमध्ये असतो. तैमूरसोबत त्याची बहिणीसुद्धा फेमस झाली आहे. आम्ही बोलतोय सोहा अली खानची मुलगी इनाया नौमी खेमू बद्दल. सध्या इनायाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसातायेत. इनायाच्या क्युटनेस ची तुलना लोक भाऊ तैमूरसोबत करताना दिसतायेत. नुकतेच सोहाने तैमूर आणि इनायाला घेऊन एक इंटरेस्टिंग किस्सा शेअर केला. सोहाने एका इव्हेंट दरम्यान सांगितले की, तैमूरसध्या अशा वयात आहे की त्याला प्रत्येक गोष्टी एक्स्प्लोर करायची असते. तो गोष्टींना ओढून घेतो आणि नंतर फेकून दोतो. इनाया अजून खूप लहान. आम्हाला भीती वाटते की तो इनायाच्या जवळ जाईल आणि तो जेव्हा इनायाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सगळ्यात सैफ अली खानना भीती वाटते.  

पुढे ती म्हणाली, तैमूर आणि इनायामध्ये काही महिन्यांचा फर्क आहे त्यामुळे तैमूरला बघून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे आम्ही आधीपासून इनायाला तयार करतो आहे. माझा भाऊ( सैफ) आणि करिना मला आणि कुणाला नेहमी कामाच्या टिप्स देत असतात ज्या आम्हाला इनायाला वाढवताना खूप महत्त्वाच्या ठरतात. 
  
गतवर्षी सोहा आणि कुणालाच्या आयुष्यात इनायाचे आगामन झाले आहे. बालकदिनाचे मुहूर्तावर डॅड कुणाल खेमूने इनायाचा फोटो शेअर केला होता. इनायाचा हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘मी जगातील सर्व मुलांना बालकदिनाच्या शुभेच्छा देतो. तुमचे बालपण आम्हा मोठ्यांना एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरणा देते. हॅपी चिल्ड्रन्स डे.’ 

ALSO READ :  ‘कालाकांडी’ही आपटला! निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरतोय ‘नवाब’ सैफ अली खान!!

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कुणाल इनायाबद्दल बोलला होता. इनायाच्या जन्माने माझे आयुष्यचं बदलले आहे. खाण्या-पिण्यापासून झोपण्याची वेळही बदलली आहे. आता मी अधिकाधिक वेळ घरात घालवू इच्छितो, जेणेकरून मुलीसोबत वेळ घालवू शकेल. आता इनाया १९ ते २० तास झोपलेली असते, असे तो म्हणाला होता.
Web Title: OMG: Timur Ali Khan raised concerns about Saif Ali Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.