OMG! Tiger Shroff's many tight rules laden with the girlfriends direction !! | OMG! टायगर श्रॉफवर गर्लफ्रेन्ड दिशा पटनीने लादले अनेक कडक नियम!!

‘बागी२’ स्टार टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांनी अद्यापही आपले नाते कबुल केलेले नाही. पण म्हणून हे नाते लोकांपासून लपूनही राहिलेले नाही. टायगर व दिशा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. आता त्यांच्या नात्याबद्दल आणखी एक बातमी समोर आली आहे. होय, दिशा म्हणे, टायगरला जराही भटकू द्यायला तयार नाहीय. टायगर कुठे जातो, काय करतो, यावर ती बारीक नजर ठेवून असते. टायगरवर तिने म्हणे पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. टायगरने त्याच्या फिमेल को-स्टार्सशी मैत्री करणे तर दूरच पण त्यांच्याशी बोलणेही दिशाला आवडत नाही. केवळ इतकेच नाही तर दिशाने टायगरसाठी अनेक नियम बनवले आहेत. शूटींगनंतर फिमेल को-स्टारसोबत बोलायचे नाही. दुसºया अभिनेत्रीसोबतचे स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे नाही. कुण्या मुलीच्या पोस्टला लाईक करायचे नाही, असे हे काही नियम असल्याचे कळतेय. सूत्रांचे मानाल तर दिशा रोज टायगरचा फोन चेक करते.
टायगरच्या जवळच्या लोकांना दिशाचा हा स्वभाव खटकू लागले नसेल तर नवल. दिशाच्या या स्वभावामुळे टायगर आपल्या कुटुंबापासूनही दूर जात असल्याचे समजतेय. विशेषत: आईपासून टायगर दुरावत चालला आहे. तशीही दिशा टायगरच्या आईला जराही पसंत नाही. पण टायगरची बहीण कृष्णासोबत मात्र तिचे चांगले बॉन्डिंग आहे. टायगरच्या एका जवळच्या मित्रानुसार, अलीकडे टायगर पूर्णपणे बदलला आहे.  
२०१५ मध्ये एका कॅडबरीच्या जाहिरातीत दिशा झळकली होती. यानंतर पुढच्याच वर्षी एका तेलगू सिनेमात तिची वर्णी लागली. यानंतर दिशाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली होती. तिच्या यातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. यापश्चात इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’मध्ये दिशा दिसली.

ALSO READ : ​टायगर श्रॉफची ‘गर्लफ्रेन्ड’ दिशा पटनीने केले हॉट फोटोशूट!
 
Web Title: OMG! Tiger Shroff's many tight rules laden with the girlfriends direction !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.