OMG! Sunny Leone will be 'Wild' to try to change image | OMG! ​इमेज बदलण्याच्या प्रयत्नांत सनी लिओनी होणार ‘वाईल्ड’ !

सनी लिओनीची इमेज काहीही असो. पण सनी आणि लोकप्रीयता दोन्ही आता एकमेकांना पर्याय ठरू पाहताहेत. निश्चितपणे बॉलिवूडमध्ये सनीला फार काही साध्य करता आलेले नाही. पण बॉलिवूडमुळेच संधींची नवी नवी कवाडं तिच्यासाठी खुलू लागली आहेत.  ‘बिग बॉस’ या शोद्वारे सनीने भारतीय टेलिव्हिजनवर आपले करिअर सुरु केले होते. यापाठोपाठ ‘स्पिल्ट्सविला’ हा शो तिने को-होस्ट केला. पण आता सनी एक मोठा आणि लोकप्रीय शो एकटीने होस्ट करणार आहे. होय, येत्या वर्षांत सुरु होत असलेल्या ‘डिस्कव्हरी जीत’ या चॅनलवरचा एक सुपरहिट शो ती होस्ट करताना दिसणार आहे. या शोचे नाव आहे, ‘मॅन वर्सेज वाईल्ड’. सनीचा हा शो ‘सर्व्हाईवर’ या इंटरनॅशनल रिअ‍ॅलिटी शोची भारतीय आवृत्ती असेल. यात काही लोकांना एखाद्या आयलँडवर सोडले जाते. या सर्वांना तेथे सर्व्हाइव्ह करायचे असते. हा शो सनी होस्ट करणार म्हटल्यावर आत्तापासून याबद्दल उत्सुकता पाहायला मिळतेय.

ALSO READ : या अजरामर नायिकेच्या बायोपिकसाठी एकट्या सनी लिओनीने दिला होकार!

सध्या सनी आपल्या इमेज मेकओव्हरमध्ये लागलीय. ‘पॉर्न स्टार’ ही इमेज सनीला पुसून काढायची आहे. बॉलिवूडमध्ये सनीला आत्तापर्यंत बोल्ड भूमिकाच मिळाल्या. त्यामुळे अलीकडे सनीने साऊथकडे मोर्चा वळवला आहे. साऊथमध्ये एक पीरियड ड्रामा फिल्म सनीने साईन केली आहे. यात सनी अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय मीना कुमारी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यासही सनी उत्सुक आहे. माधुरी दीक्षित, कंगना राणौत, विद्या बालन अशा बड्या अभिनेत्रींनी या बायोपिकसाठी नकार दिला असतानाच सनीने मात्र यात इंटरेस्ट दाखवला आहे. अर्थात तूर्तास दिग्दर्शकांनी या बायोपिकसाठी सनीचे नाव फायनल केलेले नाही. या व अशा चित्रपटामुळे तरी आपली इमेज बदलेल, असा सनीचा कयास आहे. आता या प्रयत्नांत सनीला किती यश मिळते, ते बघूच.
गुग
Web Title: OMG! Sunny Leone will be 'Wild' to try to change image
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.