OMG !! Sanjay Leela burns on Bhansali Karan Johar; But why? | OMG!! संजय लीला भन्साळींवर जळतो करण जोहर; पण का?

डायरेक्टर, प्रोड्यूसर, कोरिओग्राफर, होस्ट, राईटर, शोचा जज अशा सगळ्या भूमिकेत सुपरडुपर हिट ठरलेला करण जोहर कुणावर जळतो म्हटले तर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. करण बॉलिवूडच्या एका दिग्दर्शकावर मनातून जळतो. हा दिग्दर्शक कोण तर संजय लीला भन्साळी. होय, ‘लार्जर देन लाईफ’ सिनेमे बनवणारे संजय लीला भन्साळी!करण जोहर भन्साळींवर जळतो. खुद्द करण जोहरने अलीकडे एका मुलाखतीत हे सांगितले. ‘संजय लीला भन्साळी यांची कल्पनाशक्ती अफाट आहे. त्यांची ही कल्पनाशक्ती पाहून मला त्यांचा हेवा वाटतो. मी अक्षरश: त्यांच्यावर जळतो. भन्साळी आपल्या कामात टॉपवर आहे. त्यांचा ‘पद्मावती’ पाहायला मी आतूर आहे. भन्साळींसारखे बनायला कुणाला आवडणार नाही. मलाही आवडेल. त्यांचे चित्रपट पाहून मी खूप काही शिकलो आहे,’ असे करण म्हणाला.

अर्थात करण म्हणतोय, त्यात दम आहे. संजय लीला भन्साळींचा प्रत्येक सिनेमा हटके असतो. ‘हम दिल दे चुके सनम’,‘ब्लॅक’,‘गोलियों की रासलीला: रामलीला’,‘बाजीराव मस्तानी’ हे भन्साळींचे सिनेम प्रत्येकवेळी पाहिल्यावर नवे भासतात, यातच सगळे काही आले. आता चाहते भन्साळींच्या ‘पद्मावती’ची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटासाठी भन्साळींनी विरोध सहन केला आहे. इतके कमी की काय म्हणून लोकांचा मारही खाल्ला आहे. होय, पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत गत जानेवारीच्या अखेरिस करणी सेनेने राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’या सेटवर   धिंगाणा घातला होता. यादरम्यान ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाणही करण्यात आली होती. यानंतर ‘पद्मावती’चा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला होता. पण  अलीकडे काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटची तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता. या पश्चात ‘पद्मावती’मध्ये काहीही आक्षेपार्ह असणार नाही. राणी पद्मावती हिच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असेही काहीही पडद्यावर दाखवण्याचे आमचे प्रयत्न नाहीत, असे भन्साळी यांनी स्पष्ट केल्यानंतर हा वाद मिटला होता. अर्थात हा वाद पूर्णपणे मिटला, असे सध्या म्हणता येणार नाही. कारण चित्रपटात काही आक्षेपार्ह वाटले तर आम्ही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.

ALSO READ : Watch : ​केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!
 
Web Title: OMG !! Sanjay Leela burns on Bhansali Karan Johar; But why?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.