OMG: Saif Ali Ladki Lake, Sarah Ali Khan will not make another film now, read detailed! | OMG : सैफची लाडकी लेक सारा अली खान आता दुसरा चित्रपट करणार नाही, वाचा सविस्तर!

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिने तिच्या करिअरविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सारा तिच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात ती सुशांत सिंग राजपुत याच्यासोबत मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे, परंतु सारा आतापासूनच प्रचंड प्रसिद्धीझोतात आली आहे. असे म्हटले जात आहे की, ‘केदारनाथ’ आताच हिट झाला आहे. वास्तविक काही अंशी हे खरेदेखील आहे. कारण ज्या पद्धतीने साराच्या फॅन्सचा या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमवेल असेच काहीसे दिसत आहे. मात्र आता साराने तिच्या करिअरविषयी एक मोठा निर्णय घेतल्याने, तिच्या चाहत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

होय, साराने तिच्या करिअरविषयी एक निर्णय घेताना जाहीर केले की, आता ती दुसरा कुठलाही चित्रपट साइन करणार नाही. साराच्या मते, ती तिच्या पहिल्या चित्रपटाच्या ट्रेलर आणि फर्स्ट लूकविषयी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. त्यानंतरच दुसरा चित्रपट साइन करायचा विचार करणार आहे. असे म्हटले जात आहे की, साराची आई अमृता सिंग हिचादेखील काहीसा असाच विचार आहे. सध्या साराचे सर्व प्रोजेक्ट अमृताच बघत असून, तिच्या मते, मुलीच्या डेब्यू चित्रपटाला लोकांच्या काय प्रतिक्रिया मिळतील यावर तिच्या पुढील भूमिका निश्चित करणार आहे. वास्तविक अमृताने सुरुवातीपासून साराच्या डेब्यूविषयी सावध पावले टाकली आहेत. बºयाचशा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना तिने साराच्या वतीने नकारही दिला आहे. अशात आता सारानेदेखील मम्मी अमृताप्रमाणेच विचार करून पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर सारा सोशल मीडियावर झळकत असल्याने तिच्या फॅन्सची संख्या असंख्य आहे. अशात ती केव्हा पडद्यावर झळकणार याविषयी तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागून आहे. शिवाय पप्पा सैफलादेखील मुलीच्या डेब्यू चित्रपटाची आतुरता आहे. 

सुरुवातीला साराला करण जोहर, बोनी कपूरसारखे दिग्गज बॉलिवूडमध्ये लॉँच करू इच्छित होते. करणने तर ‘स्टुडेंट आॅफ द ईयर’ या सिरीजसाठी साराची निवडही केली होती. परंतु साराने यास नकार दिला. वास्तविक या नकारामागे मम्मी अमृताचा हात असल्याचे नंतर स्पष्ट झाले. सध्या सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, सेटवरील तिचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
Web Title: OMG: Saif Ali Ladki Lake, Sarah Ali Khan will not make another film now, read detailed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.