OMG! Ranbir Kapoor likes to play 'Playboy' image !! | OMG! रणबीर कपूरला नकोशी झालीय ‘प्लेबाय’ इमेज!!

रणबीर कपूरला सगळे ‘प्लेबॉय’ म्हणून ओळखतात. पण कदाचित रणबीरला आताश: त्याचा तिटकारा आला आहे आणि म्हणून या इमेजमधून रणबीरला बाहेर पडायचे आहे. आता आम्ही हे कशावरून म्हणतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर रणबीरने स्वत: तसे प्रयत्न चालवले आहेत. होय, गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलिया भट्ट या दोघांच्या लिंकअपच्या बातम्या येत आहेत. रणबीर व आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीरमधील जवळीक वाढत असल्याची बातमी मध्यंतरी प्रसारमाध्यमांत उमटली होती. यानंतर ही निव्वळ अफवा असल्याचेही समोर आले होते. केवळ चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी रणबीर व आलियाच्या लिंकअपची बातमी जाणीवपूर्वक पेरली गेली, असेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर एक नवी खबर आली आहे. होय, रणबीर म्हणे, या सगळ्या प्रकारावर जाम संतापला आहे. सूत्रांचे खरे मानाल तर, या पीआर गेम्समध्ये माझे नाव वापरणे बंद करा, अशी तंबी रणबीरने म्हणे संबंधिताना दिली आहे. आता हे संबंधित कोण तर करण जोहर व आलिया भट्ट. रणबीरसोबतच्या लिंकअपच्या बातम्यांबद्दल खरे तर आलिया बेपर्वा आहे. कारण ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ या चित्रपटादरम्यान अशाच लिंकअपच्या बातम्यांचा आलियाला फायदा झाला होता. त्यावेळी आलिया व वरूण धवनच्या लिंकअपच्या बातम्या पसरल्या होत्या. पण रणबीरला मात्र चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हे सगळे नकोय.

ALSO READ : ​ - तर काय माहिरा खानचे रणबीर कपूरसोबत झाले ब्रेकअप?

आलियासोबतच्या लिंकअपच्या अफवेबद्दल त्याने म्हणे धर्मा प्रॉडक्शनच्या टीमसोबतही चर्चा केली आहे. एकंदर काय तर रणबीरला खरोखरीच ‘प्लेबॉय’ ही इमेज बदलायची आहे, असे दिसतेय. रणबीरला यात यश येवो, इतकीच आशा करूयात. शेवटी काय तर देर आये, दुरस्त आयें...
Web Title: OMG! Ranbir Kapoor likes to play 'Playboy' image !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.