OMG !! Radhika Apte's 'Padman' Heroine! | OMG!! पाल खायला निघाली ‘पॅडमॅन’ची हिरोईन राधिका आपटे!

अभिनेत्री राधिका आपटे सध्या ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण इतक्या बिझी शेड्यूलमध्ये राधिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. राधिकाचा हा फोटो अनेकांच्या अंगावर काटा आणणारा आहे. होय, या फोटोत राधिकाच्या चेहºयावर एक पाल चिपकलेली आहे आणि विशेष म्हणजे, राधिका जणू तिला खाण्याच्या प्रयत्न करताना दिसतेय. राधिका तिची जीभ त्या पालीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. राधिकाने या फोटोला ‘बिहाईन्ड द सीन’ असे कॅप्शन दिले आहे.तूर्तास राधिकाच्या या फोटोवर युजर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. एका युजरने तर हा फोटो पाहिल्यानंतर राधिकाला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य एकाने राधिकाच्या हिमतीची दाद दिली आहे. कदाचित तू पहिली मुलगी आहे, जी पाल पाहिल्यानंतर अशी रिअ‍ॅक्ट झाली असेल, असे त्याने लिहिले आहे.  पालीला खाण्याचा प्रयत्न करणाºया राधिकाचा हा फोटो अनेकांना किळसवाणा वाटू शकतो. पण थांबा....या फोटोबद्दल बरे वाईट निष्कर्ष काढण्याआधी आम्ही एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. ती कुठली तर राधिकाच्या चेहºयावरची ती पाल नकली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘पॅडमॅन’च्या सेटवरचा असाच ‘बिहाईन्ड द सीन’ व्हिडिओ आऊट झाला होता. या व्हिडिओत अक्षयने याच नकली पालीने अनेकांना घाबरवले होते. यात राधिकाचाही समावेश होता.

ALSO READ : ​अक्षय कुमारच्या वागण्याने वैतागली ‘पॅडमॅन’ची टीम! पाहा व्हिडिओ!!

‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय कुमार अरूणाचलम मुरूगनाथनची भूमिका साकारताना दिसतोय. अरूणाचलम यांनी आपल्या गावातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देऊ, अशी शपथ घेतली होती. या चित्रपटात अक्षय व राधिका आपटे या दोघांशिवाय सोनम कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. 
Web Title: OMG !! Radhika Apte's 'Padman' Heroine!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.