OMG !! Priyanka Chopra cut short for 'Hollywood', beautiful hair! | OMG!! ​प्रियांका चोप्राने ‘हॉलिवूड’साठी कापले लांबसडक, सुंदर केस!

बॉलिवूड असो वा हॉलिवूड प्रत्येकठिकाणी स्वत:ची नवी ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे, हे तर तुम्ही जाणताच. याठिकाणी ‘क्वांटिको’या अमेरिकन मालिकेच्या तिसºया सीझनमध्ये ती व्यस्त आहे. ‘क्वांटिको’च्या दोन्ही सीझनमध्ये प्रियांका एलेक्स पारिशची भूमिका साकारताना दिसली होती. ‘क्वांटिको’तील प्रियांकाची भूमिका जगभरातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.  याच भूमिकेने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. कोट्यवधी लोकांची मने तिने जिंकलीत. यानंतर एकापाठोपाठ एक हॉलिवूड सिनेमेही तिला मिळालेत. 
इंटरनॅशनल स्टार झालेल्या प्रियांकाबद्दल आता एक ताजी बातमी आहे. होय, साता समुद्रापार प्रियांकाला आपल्या केसांचे बलिदान द्यावे लागलेय. पण का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही बातमी समजली तेव्हा आमचीही हीच प्रतिक्रिया होती.  लांबलचक केस कापण्याचा निर्णय शेवटी प्रियांकाला का घ्यावा लागला?  हाच प्रश्न आम्हालाही पडला होता.ALSO READ: ​‘या’ कारणामुळे प्रियांका चोप्राला गमवावे लागले होते एकाचवेळी दहा मोठे चित्रपट!

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियांकाचे कापलेले केस सगळीकडे विखुरलेले दिसताहेत. हा फोटो पाहून आमचे मन हळहळले. कदाचित तुमचीही स्थिती यापेक्षा वेगळी नसणार.अर्थात खुद्द प्रियांकानेच फोटोसोबत केस कापण्यामागचे कारणही सांगितले आहे.  ‘बाय बाय लॉन्ग हेअर...सीजन ३ मध्ये एलेक्स पारिशचे लूक कसे असणार? तुम्हाला लवकरच कळेल,’ असे तिने या फोटोसोबत लिहिले. म्हणजेच, ‘क्वांटिको3’साठी प्रियांकाला तिचे लांबसडक केस कापावे लागलेत. प्रियांकाने केस किती लहान केलेत, हे तर तिचा नवा फोटो आल्यानंतरच कळेल.  ‘क्वांटिको3’मधील तिच्या लूकची त्यामुळेच आम्हाला प्रतीक्षा राहील.  
अलीकडे प्रियांकाचा  ‘बेवॉच’ हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला. अलीकडे प्रियांकाने आणखी तीन हॉलिवूड सिनेमे हातावेगळे केले.  तूर्तास प्रियांकाकडे एकही बॉलिवूड प्रोजेक्ट नाही. पण पीसीचे भारतीय चाहते तिला पाहण्यास आतूर आहे. मध्यंतरी प्रियांका पी.टी. उषा हिच्या बायोपिकमध्ये झळणार अशी बातमी होती. अर्थात प्रियांकाने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. प्रियांका शेवटची ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दिसली होती. तेव्हापासून ती हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे.  
Web Title: OMG !! Priyanka Chopra cut short for 'Hollywood', beautiful hair!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.