OMG: Mamta Kulkarni and Ameesha Patel got a fight from the chicken! | OMG : चिकनवरून ममता कुलकर्णी अन् अमिषा पटेलमध्ये झाले होते कडाक्याचे भांडण!

अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि अमिषा पटेल या दोघींचेही बॉलिवूड करिअर फारसे विशेष राहिले नाही. अमिषाने ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर’सारखे हिट चित्रपट दिले; परंतु अशातही तिला करिअरच्या यशाची चव फार काळ चाखता आली नाही. असो, आज अमिषाविषयी बोलायचे कारण म्हणजे तिच्यासोबत घडलेला किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर बॉलिवूडमध्ये नेहमीच कॅट फाइट घडत असल्याचे आपण ऐकत आलो आहोत. अशीच काहीशी फाइट ममता कुलकर्णी आणि अमिषा पटेलमध्ये घडली होती. वास्तविक या दोघींनी एकाही चित्रपटात काम केले नाही. परंतु अशातही दोघींमधील नाते नेहमीच ताणाताणीचे राहिले आहे. खरं तर ममता कुलकर्णी नेहमीच वादात राहिली आहे. आता तर ती पोलिसांसाठी वॉन्टेड आहे. 

असो, एकदा अमिषा आणि ममताचा एका पार्टीदरम्यान सामना झाला होता. पार्टीत ममताने अमिषाला असे काही सुनावले होते की, बघणारेही चकित झाले होते. तर अमिषा ढसाढसा रडत होती. त्याचे झाले असे की, अमिषा एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मॉरिशियसला गेली होती. त्याठिकाणी आयोजित एका पार्टीत अमिषा आणि ममताचा सामना झाला. पार्टीत चिकन टेस्टवरून ममता वेटरवर जोरजोरात ओरडत होती. त्यावेळी ममता एवढी रागात होती की, तिला हटकण्याची कोणातही हिम्मत नव्हती. अशात अमिषाने वेटरची बाजू घेत ममताला थांबविण्याचा प्रयत्न केला. 

अमिषाने ममताला शांत राहण्याचे सांगितले. मात्र ही बाब ममताला अजिबातच आवडली नाही. तिने वेटरला सोडून अमिषाची खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली. तिला असे काही सुनावले की, उपस्थित हैराण झाले. ममताने अमिषाला सुनावताना तिला स्मरण करून दिली की, ती बॉलिवूडमधील किती मोठी अभिनेत्री आहे. वास्तविक त्यावेळी अमिषाच्या करिअरची सुरुवातही चांगलीच धमाकेदार झालेली होती. त्यामुळे अमिषानेही तिच्या सगळ्या गोष्टी ऐकूण घेतल्या नाहीत. तिने ममताच्या गुन्हेगारी जगताचे पत्ते खोलण्यास सुरुवात केली. तिला सुनावण्यात आलेल्या शिक्षेवरून तिला टोमणेही मारले. 

ममता जास्त शिकलेली नसल्याने तिला अमिषाच्या प्रत्येक टोमण्यांचे उत्तर देता आले नाही. ती काही वेळानंतर शांत झाली. परंतु याचदरम्यान ममताच्या सेक्रेटरीने अमिषाबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी अमिषा पटेलची आई आशा पटेलही पार्टीत उपस्थित होत्या. त्यांनी सेक्रेटरीच्या जोरदार कानाखाली वाजविली. त्यावेळी हे प्रकरण मोठ्या मुश्किलीने शांत करण्यात आले. परंतु हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’च्या सक्सेस पार्टीत पुन्हा एकदा या दोघींचा आमना-सामना झाला. पार्टीत अमिषाने ममताकडे दुर्लक्ष केले. ज्यामुळे ममता चांगलीच संतापली. तिने तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. प्रकरण वाढत असताना हृतिकची बहीण सुनैनाने मध्यस्थी करीत दोघींना शांत केले. पुढे ममता अर्ध्यातूनच पार्टी सोडून गेली. 

Web Title: OMG: Mamta Kulkarni and Ameesha Patel got a fight from the chicken!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.