OMG: Krypton Sanan, stuck in lift, asks for help on Twitter! | OMG : लिफ्टमध्ये अडकली क्रिती सॅनन, ट्विटरवर मागितली मदत!

अभिनेत्री क्रिती सॅनन आगामी ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात बघावयास मिळणार  आहे. चित्रपटात ती पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीतसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. असो, क्रितीबद्दल सध्या एक बातमी समोर आली असून, ती वाचून तिच्या चाहत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. होय, क्रिती लिफ्टमध्ये अडकल्याची बातमी समोर येत आहे. याबाबतची माहिती स्वत: क्रितीनेच तिच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. क्रितीने ट्विट करताच तिच्या चाहत्यांनी त्यास प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 

क्रितीने ट्विटवर लिहिले की, ‘मी लिफ्टमध्ये अडकली आहे. मात्र अशातही मला याठिकाणी थ्री जी नेटवर्क मिळत आहे. हे मुंबईमध्ये शक्य आहे काय?’ या ट्विटसोबत क्रितीने काही इमोजीचाही वापर केला. क्रितीच्या या ट्विटला रिप्लाय देताना एक युजरने लिहिले की, ‘मी आणि तू एका लिफ्टमध्ये अडकलो असतो तर मी माझ्या मनातील गोष्ट तुला सांगू शकलो असतो.’

पुढे क्रितीने आणखी एक ट्विट केले. तिच्या दुसºया ट्विटमध्ये तिने आयशा अहमद नावाच्या एका युजरला टॅग करताना लिहिले की, ‘मला बाहेर काढा, मिटिंगला जाण्यास उशीर होत आहे.’ सेजल नावाच्या एका युजर्सनी लिहिले की, ‘काळजी करू नकोस, मोहब्बत मॅन तुला बाहेर काढण्यासाठी येत आहे.’ तर काही युजर्सनी चक्क तिला पत्ता विचारत तुला बाहेर काढण्यासाठी आम्ही येत असल्याचे म्हटले. क्रिती ‘पटियाला अर्जुन’ या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. तर दिलजीत एका लहान शहरातील तरुणाची भूमिका साकारणार आहे. तिचा हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: OMG: Krypton Sanan, stuck in lift, asks for help on Twitter!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.