OMG: 'Kisung Attack' by Varun Dhawan, actor 'Photos'! | OMG : वरुण धवनवर ‘या’ अभिनेत्याने केला किसिंग अटॅक, पहा फोटो!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कधी काय करेल याचा भरवसाच नाही. काही दिवसांपूर्वीच तो अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्या रूममधील ‘टॉयलेट’मध्ये घुसला  होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अर्थान हा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता. आता पुन्हा एकदा त्याने असाच काहीसा कारनामा केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळेस त्याने चक्क मीडियाच्या कॅमेºयांसमोर अभिनेता वरुण धवन याच्यावर किसिंग अटॅक केला आहे. जेव्हा रणवीर वरुणला किस करीत होता, तेव्हा हा सीन्स बघण्यासारखा होता. 

विशेष म्हणजे रणवीर हा सर्व प्रताप माध्यमांच्या कॅमेºयासमोर करीत होता. मात्र रणवीरवर त्याचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसत होते. मात्र वरुणची अवस्था यावेळेस खूपच बिकट झाल्याची दिसत होती. जेव्हा रणवीर त्याला किस करीत होता, तेव्हा तो लाजत होता. मात्र ऐकणार तो रणवीर कसला... माझे प्रेम दर्शविण्याचा असाच अंदाज असल्याचे त्याने उत्तर दिले. हे दोघे मुंबई येथील महबूब स्टुडिओमध्ये काम करीत आहेत, जेव्हा त्यांचा आमना-सामना झाला तेव्हा हा किसिंग अटॅक घडला. यावेळी दोघेही खूपच सिम्पल लूकमध्ये होते. मात्र अशातही दोघांचा भेटण्याचा अंदाज चर्चेत राहिला. वरुणने नुकतीच त्याच्या आगामी ‘जुडवा-२’ची शूटिंग पूर्ण केली आहे. जुडवाच्या अखेरच्या शेड्यूलची शूटिंग मॉरिशसमध्ये पूर्ण करण्यात आली. ‘जुडवा-२’ १९९७ मध्ये आलेल्या सलमानच्या ‘जुडवा’चा सीक्वल आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सलमान खानचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सलमानसोबत ‘जुडवा-२’ची संपूर्ण टीम दिसत होती. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच पसंत केला गेला. दरम्यान, चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये सलमान एक गेस्ट अपियरेंस देणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री करिष्मा कपूरही झळकण्याची शक्यता आहे. वरुण ‘जुडवा-२’ व्यतिरिक्त सुजीत सरकारच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही सध्या व्यस्त आहे. तर रणवीर सिंग ‘पद्मावती’मध्ये व्यस्त असून, त्यामध्ये तो अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि शाहीद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहे. 
Web Title: OMG: 'Kisung Attack' by Varun Dhawan, actor 'Photos'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.