OMG: Kareena Kapoor Khan was dressed in this film with 130 designers dressing up. | OMG : करिना कपूर खानने या चित्रपटात परिधाने केले होते तब्बल १३० डिझायनर्सचे ड्रेस..

बॉलिवूडचे  बहुतेक सर्वच कलाकार महागडे आणि डिझायनर्स कपडे वापरतात. ठिक तसेच जसे ते चित्रपटामध्ये सुद्धा स्क्रिप्टच्या मागणीनुसार डिझायनर कपडे वापरतात ही काही तशी मोठी गोष्ट नाही.  एक चित्रपटासाठी एका अभिनेत्रीने १०० पेक्षा अधिक डिझायनर ड्रेस वापरले होते  हे तुम्हाला माहिती आहे का ? होय, तुम्ही बरोबर वाचलात आम्ही तुम्हाला सांगतो आहे ती अभिनेत्री दुसरी, तिसरी कोणी नसून पतौडी खानदानची सून करिना कपूर खान आहे.   तिने चित्रपटात १०० हुन अधिक महागडे डिझायनर ड्रेस बदलले होते. करिना कपूर बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रीं पैकी एक आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने आपल्या फॅन्सच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाप्रमाणे प्रेक्षकांना तिची स्टाईल ही तेवढीच आवडते. ती सुद्धा आपल्या चाहत्यांना खुष ठेवण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते.  

ALSO READ :  'या' अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होऊन घरातून पळून जाणार होती करिना कपूर

करिना कपूरने आतापर्यंत केलेल्या कोणत्याच चित्रपटामध्ये एवढे ड्रेस कधीच बदलले नव्हते तेवढे तिने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या हिरोईन चित्रपटात बदलले होते. 
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार करीना कपूरने या चित्रपटात तब्बल १३० डिझायनर्सचे ड्रेस वापरले होते आणि ते सर्व ड्रेस जगात प्रसिद्ध असलेल्या डिझायनर्सकडून बनवण्यात आले होते. ज्यामुळे करीना या चित्रपटात आणखीच सुंदर दिसत होती. तैमूरच्या जन्मानंतर करिनाने काही काळ कामातून ब्रेक घेतला होता मात्र ती वीरे दी वेडिंगमधून पुन्हा दमादार कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. 'वीरे दी वेडिंग'मध्ये ती एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे. यात तिच्यासह सोनम कपूर आणि स्वरा भास्कर सुद्धा दिसणार आहेत.  हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या करिना वजन कमी करण्यासाठी तब्बल 10 - 10 तास वर्कआऊट करत असल्याचे समजते आहे. 

Web Title: OMG: Kareena Kapoor Khan was dressed in this film with 130 designers dressing up.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.