OMG! Jackie Shroff talking about childhood girlfriend !! | OMG! ​मुलाच्या गर्लफ्रेन्डबद्दल हे काय बोलून गेलेत जॅकी श्रॉफ!!

दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ या दोघांची जोडी लोकांना प्रचंड आवडते. लवकरच ही जोडी ‘बागी2’मध्ये दिसणार आहे. ही जोडी केवळ ‘रिल लाईफ’ जोडी नाही तर ‘रिअल लाईफ’ जोडी आहे, हे आता सगळ्यांना ठाऊक झाले आहे. त्यामुळेच टायगर व दिशा दोघे  कितीही लपवो, पण त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा आता कानोकानी आहे. आता तर म्हणे, दिशा टायगरवर हक्कही गाजवू लागली आहे. फिमेल को-स्टार्सशी बोलू नको, सोशल मीडियावर त्यांच्या कमेंट्सला लाईक करू नकोस, स्वत:चे को-स्टारसोबतचे फोटो शेअर करू नकोस, असे काय काय नियम तिने म्हणे टायगरला घालून दिले आहेत. टायगरचे कुटुंब, विशेषत: टायगरच्या आईला हे सगळे खटकू लागल्याचीही  चर्चा आहे. आता यात किती तथ्य आहे, हे  आम्हाला ठाऊक नाही. कारण  तूर्तास आम्ही टायगरच्या आईबद्दल नाही तर त्याच्या डॅडबद्दल बोलणार आहोत. होय, आम्ही जॅकी श्रॉफबद्दल बोलणार आहोत. टायगरची गर्लफ्रेन्ड दिशाबद्दल जॅकी असे काही बोलून गेलेत की, ऐकून दिशालाही क्षणभर राग येईल. होय, अलीकडे जॅकी नेहा धूपियाच्या एका चॅट शोमध्ये आले होते. या चॅट शोमध्ये नेहाने जॅकी यांना दिशाबद्दल विचारले. दिशा व टायगर या दोघांपैकी कोण चांगली अ‍ॅक्टिंग करतो, असे तुम्हाला वाटते? असा प्रश्न नेहाने केला. यावर एक क्षणही न दवडता जॅकींनी टायगर असे उत्तर दिले. आता हे उत्तर ऐकून दिशाला किती व्होल्टचा झटका लागतो, हे तिलाच ठाऊक़ पण झटका लागणार, हे जरूर. दिशाच्या चाहत्यांनाही ही बाब खटकू शकते.

ALSO READ : OMG! टायगर श्रॉफवर गर्लफ्रेन्ड दिशा पटनीने लादले अनेक कडक नियम!!

२०१५ मध्ये दिशा एका कॅडबरीच्या जाहिरातीत  झळकली होती. यानंतर पुढच्याच वर्षी एका तेलगू सिनेमात तिची वर्णी लागली. यानंतर दिशाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली होती. तिच्या यातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. यापश्चात इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’मध्ये दिशा दिसली होती.
Web Title: OMG! Jackie Shroff talking about childhood girlfriend !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.